शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराच्या दिरंगाईचा महापालिका कर्मचाऱ्यांना फटका, कारवाईची मागणी 

By नामदेव मोरे | Updated: July 5, 2024 18:00 IST

फॉर्म १६ मिळण्यास विलंब : निष्काळजीपणा करणारांवर कारवाईची मागणी 

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष २०२३ - २४ साठीचा फॉर्म १६ मिळण्यास विलंब होत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असून आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून संबंधीत ठेकेदार कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे.

फॉर्म १६ मिळण्यास विलंब होत असल्याबद्दलची नाराजी कर्मचाऱ्यांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही त्यांनी केला आहे. कर्मचारी संघटनांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. यानंतर गुरुवारी लेखा विभागाने प्रशासन उपायुक्तांना पत्र देवून याविशयी वस्तूस्थिती स्पष्ट केली आहे.

फॉर्म १६ पार्ट ए व बी मधील एकूण वेतनाच्या रकमांमध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक त्रैमासिक अखेरीस पीआयएस संगणक प्रणालीतून मार्स टेलीकम्युनिकेशन प्रा. ली. यांच्या मार्फत वेतनाच्या तपशीलावरून डाटा आयकर विभागाच्या आयटी पोर्टल व ट्रेसेस च्या वेबसाईटवर अपलोड केला जातो. २०२३ - २४ च्या त्रैमासिक माहितीमध्ये सानुग्रह अनुदानाची रक्कम समाविष्ठ नाही व चतुर्थ व अंतिम त्रैमासिक डाटानुसार एक महिन्याच्या वेतनाची दुबार नोंद झाल्याचे निदर्शनास आले आहे. 

यामुळे इंकम टॅक्स पोर्टल व ट्रेसेस वर काही कर्मचाऱ्यांची पार्ट ए व बी मधील ऑनलाईन दुरुस्तीचे काम सुरू आहे. यानंतरच फॉर्म १६ कर्मचाऱ्यांना देणे शक्य होणार आहे. वरील कारणांमुळे या कामास विलंब झाला असून अधिकारी, कर्मचारी यांना ई रिटर्न फाईल करण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्यास त्यास लेखा विभाग जबाबदार राहणार नाही असे लेखा विभागाने प्रशासन विभागास कळविले आहे.

गोंधळास जबाबदार कोण?याविषयी माहिती वेळेत देण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीकडून दोन वर्षांपासून चुकीचे माहिती मिळत आहे. यामुळे फॉर्म १६ वेळेत मिळत् नाही. यामुळे संबंधीतांवर कारवाई करणे प्रस्तावीत केले असल्याचेही प्रशासन विभागाला दिलेल्या पत्रामध्ये लेखाविभागाने स्पष्ट केले आहे. या सर्व गोंधळाचा फटका अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसणार असून त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता कर्मचारी उपस्थित करत आहेत.

कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेले प्रश्नफॉर्म १६ मिळण्यास विलंब कोणामुळे झाला याचे नुकसान कर्मचाऱ्यांनी का सहन करायचे. वेळेत रिटर्न सादर केले नाही व आयकर विभागाची नोटीस आली तर जबाबदार कोण. वेळेत रिटर्न न केल्यामुळे दंडात्मक कारवाई झाली तर त्याला जबाबदार कोण. वेळेत फॉर्म १६ न मिळल्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट मिळण्यास विलंब झाला असल्याचेही कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई