शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई महापौरांची सायकल सफारी

By admin | Updated: January 17, 2016 03:19 IST

नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महापौरांनी अवलंबलेली सायकल सफारी सध्या चर्चेचा विषय बनत आहे. जाहिरातीमुळे प्रबोधन होत नसल्याचे पाहून त्यांनी

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईनागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महापौरांनी अवलंबलेली सायकल सफारी सध्या चर्चेचा विषय बनत आहे. जाहिरातीमुळे प्रबोधन होत नसल्याचे पाहून त्यांनी नवा पायंडा पाडला आहे.ऐरोली, दिघा व रबाळे परिसरातील रहिवाशांना सुटबुट घातलेली व्यक्ती सायकलवर जाताना पाहून काहीसे आश्चर्य वाटत आहे. सायकलवर फिरणारी ती प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे महापौर सुधाकर सोनवणे आहेत, हे कळल्यानंतर तर अनेकांचा त्यावर विश्वासही बसत नाही. शुक्रवारी संध्याकाळी ऐरोलीत सुरू असलेल्या भारत महोत्सवादरम्यान उपस्थितांनाही असाच काहीसा आश्चर्याचा धक्का बसला. महापौरांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असतानाच एक सायकल गर्दीजवळ थांबली, तेव्हा समजते हे तर महापौर!रबाळे येथे राहणारे महापौर सोनवणे यांनी लगतच्या परिसरात कार्यक्रमांना जाण्यासाठी सायकल वापरायला सुरुवात केली आहे. पर्यावरण संवर्धन व निरोगी आरोग्य हाच त्यांचा उद्देश आहे. प्रत्येक जण परिसरात फिरण्यासाठी वाहनांऐवजी पायी चालत गेल्यास किंवा सायकल वापरल्यास प्रदूषणाला आळा बसू शकतो. हेच सांगण्यासाठी त्यांनी थेट कृतीतून समाजापुढे नवा पायंडा पाडला आहे. वाढत्या रहदारीमुळे निश्चित ठिकाणी पोहोचताना प्रत्येकाला वाहतूककोंडी व प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक परिसरात कार्यक्रमाच्या निमित्ताने फिरताना हा त्रास टाळण्यासाठी सायकलचा प्रवास उत्तम आहे.- सुधाकर सोनवणे, महापौर