शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

‘कोल्ड प्ले’ मुळे नवी मुंबई मालामाल; हॉटेल, पार्किंगच्या जागा फुल्ल; एनएमएमटीच्या जादा बस तैनात

By नामदेव मोरे | Updated: January 18, 2025 09:32 IST

पार्किंगच्या जागांचेही आगाऊ आरक्षण करण्यात आले आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : ‘कोल्ड प्ले’या विख्यात ब्रिटिश रॉक बॅण्डचा शो आज, शनिवारपासून येथील डी. वाय पाटील स्टेडियममध्ये होत आहे. या कॉन्सर्टमुळे देशभरातून रॉक बॅण्डचे चाहते शहरात येणार असल्याने येथील प्रमुख हॉटेलच्या खोल्या फुल्ल झाल्या आहेत. 

पार्किंगच्या जागांचेही आगाऊ आरक्षण करण्यात आले आहे. देशविदेशातून येणाऱ्या चाहत्यांच्या वाहतुकीसाठी नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या २५ बस सज्ज झाल्या आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या शोमुळे शहराच्या अर्थव्यस्थेत मोलाची भर पडणार आहे. 

कोल्ड प्ले रॉक बॅण्ड शोचा आनंद लुटण्यासाठी अनेक तरुण देशविदेशातून शहरात डेरेदाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी हॉटेल सज्ज झाली आहेत. वाशी ते खारघरपर्यंतची सर्व प्रमुख हॉटेल १८ ते २० जानेवारीदरम्यान हाऊसफुल्ल आहेत. 

हॉस्पिटॅलिटीसाठी बूस्टरकार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या एका प्रमुख हॉटेलमध्ये कमीत कमी ५० हजार रुपये व जास्तीत जास्त दीड लाख रुपये एक रूमसाठी मोजावे लागणार आहेत. कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हेच दर १२ हजार ते १ लाख १२ हजार एवढे असणार आहेत. शहरातील इतर हॉटेलच्या दरामध्येही वाढ झाली आहे. अनेक हॉटेलमधील सर्व रुम्सचे बुकिंग झाले आहेत. कोल्ड प्ले काळात हॉटेल व्यावसायिकांची कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. हा कार्यक्रम हॉस्पिटॅलिटी व्यवसायासाठी बूस्टर ठरला आहे. 

रंगरंगोटीसाठी २५ लाखकोल्ड प्लेच्या निमित्ताने महापालिका प्रशासनाने महामार्गासह डॉ. डी. वाय. पाटील मैदान परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविली आहे. रस्त्यांची डागडुजी करून दुभाजकांची रंगरंगोटी केली आहे. त्यासाठी साधारण २५ लाख रुपये खर्च झाला आहे.  डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलसमोरील तुलसी मैदान व सेक्टर १५ मध्ये पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.

असे आहेत नवी मुंबईतील हॉटेलचे वाढलेले दर हॉटेलचे नाव    कार्यक्रमाच्या दिवशीचे दर    कार्यक्रमानंतरचे दरकोर्ट यार्ड मेरियट    ५० हजार ते दीड लाख    १२ हजार ते १ लाख १२ हजारविवांता    २१ हजार ते ४०,५००    ८ हजार ते २३ हजारआयबीआयएस    २१ हजार    ९३००फोरपॉइंट    २२ हजार ते २३,६००    १४ हजार ते १६ हजारतुंगा    १४ हजार ते ५६ हजार    ७५०० ते २६५००योगी    १८,७००    ६१००

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई