शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई : विमानतळाच्या कामात फसवणूक, प्रकल्पग्रस्तांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 03:06 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्राच्या कामाला सुरुवात झाली आहे. या वेळी देण्यात आलेल्या पॅकेजमध्ये पन्नास टक्के कामे प्रकल्पबाधितांना देण्यात येणार

अरूणकुमार मेहत्रे कळंबोली : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्राच्या कामाला सुरुवात झाली आहे. या वेळी देण्यात आलेल्या पॅकेजमध्ये पन्नास टक्के कामे प्रकल्पबाधितांना देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु ग्रामस्थ आजही याबाबत अनभिज्ञ आहेत. किती कोटी रुपयांचे काम आहे ते कोण करीत आहे, याबाबत त्यांना काहीच माहिती नाही. यामुळे कोंबडभुजे प्रकल्पबाधितांमध्ये नाराजीचा सूर आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात बाधित होणाºयांकरिता शासनाने पॅकेज जाहीर केले आहे. त्यामध्ये स्थलांतरित होणाºया १० गावांमधील प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या स्वत: राहत असलेल्या घराच्या पाया क्षेत्राच्या तिप्पट क्षेत्राचा विकसित भूखंड देणे, शेतकºयांना साडेबावीस टक्के विकसित भूखंड देण्याचे सिडकोने कबुल केले आहे. त्याचबरोबर भरावाचे पन्नास टक्के कामे स्थानिक प्रकल्पबाधितांना देण्याचे जाहीर करण्यात आले होते.सिडकोने चार ते पाच ठिकाणी विमानतळाच्या कामाला सुरुवात केली आहे. वास्तविक आधी पुनर्वसन आणि नंतर काम सुरू करण्याचे ठरले होते; परंतु सिडकोने आधी गाभा क्षेत्राचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर दुय्यम कामेही काही महिन्यांपासून सुरू आहेत. ज्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. तिथे अद्याप पायाभूत सुविधा दिलेल्या नाहीत. त्याकडे दुर्लक्ष करून सिडको विमानतळाच्या कामाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मागील आठवड्यात प्रकल्पग्रस्तांनी घाईघाईने करण्यात आलेल्या भूमिपूजनाला विरोध केला. त्याचबरोबर रविवारी चार गावांतील ग्रामस्थ एकत्र आले आणि जोपर्यंत पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत विमानतळाच्या कामाला विरोध करायचा निर्णय त्यांनी घेतला.कोंबडभुजे गावच्या हद्दीत तीन ते चार ठिकाणी विमानतळाला पूरक कामे सुरू आहेत. ग्रामस्थांना ही कामे किती कोटींची आहेत, ती कोणाला देण्यात आलेली आहेत, याबाबत काहीच माहिती नसल्याचे सुरेश भगत यांनी सांगितले. यापैकी पन्नास टक्के कामे सिडकोने नियमानुसार आम्हाला देणे बंधनकारक आहे. सिडको आणि लागेबांधे असल्याने विमानतळ बाधितांना अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप भगत यांनी केला आहे.वातावरण चिघळण्याची शक्यताकोंबडभुजे, तरघर, उलवे, गणेशपुरी या चार गावांनी एकत्रित गुरूवारी विमानतळाच्या कामांना त्या ठिकाणी जाऊन विरोध करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमण्याची शक्यता आहे. या वेळी विमानतळबाधींचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला जाणार आहे.

टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबई