शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई : डॉलरच्या बहाण्याने दहा लाखाची फसवणूक, फेसबुकवरील महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट पडली महागात 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 26, 2023 14:55 IST

महिलेच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून वृद्धाला ९ लाख ४३ हजाराचा गंडा घातला आहे.

नवी मुंबई : फेसबुकवर महिलेच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून वृद्धाला ९ लाख ४३ हजाराचा गंडा घातला आहे. फुकटात अमेरिकन डॉलर पाठवते सांगितल्यानंतर ते पार्सल मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेरुळ येथे राहणाऱ्या सुखदेव शिंदे (६३) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना जेनी बार्टली नावाच्या महिलेने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यांनी ती स्वीकारली असता आपण यूएस आर्मी मध्ये असल्याचे त्या खातेधारकाने सुखदेव यांना सांगितले. तसेच त्यांना काही अमेरिकन डॉलर पाठवत असल्याचेही त्यांना सांगण्यात आले. यानंतर काही दिवसातच सुखदेव यांना एका व्यक्तीने दिल्ली कस्टम मधून बोलत असल्याचे सांगून त्यांचे अमेरिकेतून पार्सल आले असून ते घेण्यासाठी कस्टम ३८ हजार रुपये चार्ज मागितला.

सुखदेव यांनी त्या व्यक्तीने दिलेल्या खात्यावर रक्कम पाठवताच काही दिवसांनी त्यांना आयकर विभागाकडून बोलत असल्याचे सांगून तसेच इतर विविध कारणांनी त्यांच्याकडून तब्बल ९ लाख ४३ हजार रुपये घेण्यात आले. यानंतर देखील आपल्याला पार्सल मिळत नसल्याने त्यांनी संबंधितांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद द्यायचे बंद केले. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शनिवारी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली.

त्याद्वारे जेनी बार्टली नावाच्या फेसबुक खातेधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत. शहरात यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. त्यानंतरही सुखदेव हे फेसबुकवरील अज्ञात व्यक्तीच्या बतावणीला फसल्याने त्यांना ९ लाख ४३ हजार रुपये गमवावे लागले आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजी