शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

नवी मुंबई शहरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दोन वर्षांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 00:28 IST

प्रादुर्भाव नियंत्रणात; जानेवारी महिन्यातील सात दिवस एकही मृत्यू नाही

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तब्बल ७३० दिवसांवर पोहोचला आहे. जानेवारी महिन्यातील सात दिवस एकही मृत्यू झाला नसल्याची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाणही नियंत्रणात येऊ लागल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत  आहे.नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी चाचण्यांची संख्या कमी करण्यात आलेली नाही. रेल्वे स्टेशन्सवरही तपासणी केद्रे सुरू आहेत. जानेवारी महिन्यातही ५३७२३ चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. या चाचण्यांमध्ये २००७ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. शहरातील पॉझिटिव्हिटी रेट ३.७३ एवढा कमी झाला आहे. नोव्हेंबरमध्ये रुग्ण दुप्पट हेण्याचा कालावधी २६३ होता तो ७३० वर पोहोचला आहे. डिसेंबरमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८९१ होती ती ७८९ वर आली आहे. रुग्ण कमी झाल्याने पालिकेने शहरातील १० कोविड केअर सेंटर व २ डेडिकेटेड काेविड सेंटर बंद केली आहेत. कोरोना लसीकरण अभियानही प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारपर्यंत पहिल्या ९७०३ आरोग्यकर्मींना लसीकरण झाले आहे. २ फेब्रुवारीपासून दुसऱ्या टप्प्यामध्ये असलेल्या पोलीस, सुरक्षा, स्वच्छता अशा प्रकारे अग्रभागी असणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या लसीकरणासही सुरुवात झालेली असून ७४२ योद्ध्यांचे लसीकरण झालेले आहे.ही लस सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यास काही अवधी लागणार असल्याने मास्कचा नियमित वापर, सतत हात धुणे व एकमेकांपासून अंतर राखणे हीच कोरोनापासून बचावाची त्रिसूत्री आहे हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने स्वत:चे व इतरांचे रक्षण करण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.१ ते ५ फेब्रुवारीपर्यंतचा तपशीलएकूण चाचण्या - १०१७६आरटीपीसीआर - ८५८०ॲन्टीजेन - १५९६रुग्ण - ३१७कोरोनामुक्त - ३२७मृत्यू - ३सक्रिय रुग्ण - ७८९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या