शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नेवाळीत कोम्बिंग आॅपरेशन

By admin | Updated: June 24, 2017 00:35 IST

नेवाळीच्या धावपट्टीसाठी दिलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी घेतलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण कोणी दिले

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळीच्या धावपट्टीसाठी दिलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी घेतलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण कोणी दिले, उद्रेकासाठी त्यांना कोणी फूस लावली, याचा शोध घेण्यासाठी गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन केले. या वेळी पोलिसांनी नेवाळी, नेवाळी पाडा, चिंचवली या गावातील घरांच्या दारावर लाथा मारल्या, खिडक्यांच्या काचा फोडल्या. घराबाहेर असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. त्यामुळे घरातील महिला व लहान मुलांनी रात्र जागून काढली, असा आरोप गावकऱ्यांनी केला. तो पोलिसांनी फेटाळून लावला. पण या घटनेचे आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे, असा दावा गावकऱ्यांनी केल्याने पोलीस-गावकऱ्यांतील संघर्ष चिघळला आहे. आंदोलनानंतर आता गावात पोलिसांच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नेवाळी परिसरात आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता होती. रास्ता रोको आणि मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या मते आमचे आंदोलन शांततेत सुरु होते. पोलिसांनी भाल गावातील महिला मोर्चेकऱ्यांवर लाठीमार केल्याने पुरुष आंदोलकांनी प्रतिकार करण्यासाठी पोलिसांवर दगडफेक केली, असा त्यांचा युक्तिवाद आहे; तर पोलिसांनी मात्र आंदोलक हिंसक झाल्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी दगडफेक करुन दंडुक्यांनी मारहाण करत जाळपोळ करत आंदोलनाला हिंसक वळण दिले. त्यामुळे गुरूवारी रात्री डोंबिवलीत १५० ते २०० जणांविरोधात आणि शुक्रवारी उल्हासनगरच्या हिललाइन पोलीस ठाण्यात २५० ते ३०० आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. या आंदोलकांपैकी शंभराहून अधिक जण हल्लेखोर असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. हे हल्लेखोर गावातील आहेत की आसपासच्या परिसरातील आहेत, त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी वेगवेगळ््या मार्गांनी सुरू केले आहे.पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हे दाखल करून हिंसक आंदोलकांचा शोध घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्या आंदोलकांच्या शोधासाठी पोलिसांनी मध्यरात्री कोम्ंिबग आॅपरेशन सुरु केले. नेवाळी, नेवाळी पाडा आणि चिंचवली परिसरात पोलीस रात्रीच्या सुमारास घुसले. पण दारे उघडली जात नसल्याने त्यांनी दारावर लाथा मारल्या, असा आरोप गावकऱ्यांनी केला: तर काही महिलांनी पोलिसांनी रात्री पुन्हा पेलेट गनमधून गोळ््या झाडल्याचा आरोप केला. पोलिसांनी गाड्या उलथवून टाकल्या, खिडक्यांच्या काचा फोडल्या. रस्त्यावर घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी वातावरण शांत करण्याऐवजी लगेचच कोम्ंिबग आॅपरेशन करुन करुन तणाव वाढवला. त्यामुले गुरूवारच्या आंदोलनानंतर नेवाळी परिसरातील शाळा-कॉलेज दुसऱ्या दिवशीही बंद होती. मुलांच्या मनातही भीती होती. पोलिसांकडून बळाचा वापर सुरुच आहे. तसा वापर त्यांनी सुरुच ठेवला, तरी आंदोलन सुरु राहील, असा इशारा स्थानिक ग्रामस्थ सुनील राणे यांनी दिला. ग्रामस्थांनी पोलिसांवर केलेले आरोप पोलिसांनी मात्र फेटाळून लावले. आंदोलकांच्या शोधासाठी पोलीस गावात गेले होते. त्यांनी कोणाच्याही मालमत्तेचे नुकसान केलेले नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण पोलिसांनी गावात नुकसान केल्याचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.