शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय एकतेसाठी धावले नवी मुंबईकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:51 IST

पोलिसांतर्फे मॅरेथॉनचे आयोजन; लहान मुलांसह तरुण व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग

नवी मुंबई : राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई पोलिसांच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ या शीर्षकाखाली मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. दोन व पाच किलो मीटरच्या अंतरासाठी झालेल्या या मॅरेथॉनमध्ये लहान मुलांसह तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या वेळी प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो, त्यानुसार बुधवारी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने वाहतूक शाखेमार्फत मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. वाशीतील अरेंजा चौकातून या मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली. पाच व दहा कि.मी.च्या अंतराच्या दोन गटांत झालेल्या मॅरेथॉनमध्ये ७०० हून अधिक स्पर्धकांनी, तसेच पोलिसांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. नागरिकांना एकतेचा संदेश देण्याच्या भावनेतून त्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पोलीस आयुक्त संजय कुमार, सहआयुक्त डॉ. सुरेशकुमार मेकला, उपआयुक्त तुषार दोशी, सुरेश लोखंडे, सुधाकर पठारे, अशोक दुधे, पंकज डहाळे आदीसह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तर मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांसाठी हल्ली व्यायामाच्या प्रकारात तरुणांचे आकर्षण असलेल्या झुंबाचेही आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाच कि.मी. अंतराच्या पुरुष गटातून करण देवरे, स्वप्निल लवटे व राणाप्रताप सिंग यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे महिलांच्या गटातून कोमल खांडेकर, संगीता पाटील व पूजा कांबळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. तर दहा कि.मी. अंतराच्या पुरुष गटातून विद्यानंद यादव, मनोज गावित, तुषार पवार यांनी तर महिला गटातून स्नेहा ठक्कर, प्रतिची दिघेकर व वंदना आझाद यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. ज्येष्ठ नागरिकांच्या गटातून ६८ वर्षीय आर. के. शर्मा यांनी प्रथम, तर स्वाती भागवत व शोभा मेनन यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. लहान मुलांच्या गटातून जमनेश पाटील, वैभवी भोइटे व शुभम मलिक यांनी अनुक्रमे बाजी मारली. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्याची सामूहिक शपथही घेतली.भाजपातर्फे एकता रॅलीराष्ट्रीय एकता दिनाच्या औचित्यावर भाजपातर्फे कोपरखैरणे ते घणसोली दरम्यान रॅली काढण्यात आली. या वेळी घोषणांच्या माध्यमातून नागरिकांना राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला, तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात आला. रॅलीमध्ये आमदार रमेश पाटील, नगरसेविका उषा पाटील, कृष्णा पाटील यांच्यासह भाजपा ऐरोली विधानसभा क्षेत्रातले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.वाशीत पोलिसांचे संचलनराष्ट्रीय एकता दिनाच्या औचित्यावर पोलिसांच्या वतीने वाशी रेल्वेस्थानक ते वाशी पोलीस ठाण्यादरम्यान संचलन करण्यात आले. त्यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हाती राष्ट्रध्वज घेऊन निघालेले हे संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई