शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक नाल्यांचा झोपडीवासीयांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 05:54 IST

जेएनएनयूआरएम अंतर्गत निधी मिळाला नसल्याने महापालिकेचे एकत्रित नाला व्हिजन बारगळले आहे.

नवी मुंबई : जेएनएनयूआरएम अंतर्गत निधी मिळाला नसल्याने महापालिकेचे एकत्रित नाला व्हिजन बारगळले आहे. नाल्यांना संरक्षण भिंत नसल्यामुळे नेरुळ ते दिघा दरम्यान अनेक ठिकाणी पावसाचे पाणी वसाहतीमध्ये घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर गंभीर दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या एक बाजूला डोंगररांगा व दुसऱ्या बाजूला खाडी आहे. पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाणी १० प्रमुख व २९ मोठ्या नाल्यांमधून खाडीला जाऊन मिळते. अनेक नाल्यांमधून नदीप्रमाणे पाणी ओसंडून वाहत असते. २६ जुलै २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये नाल्यांमधील पाणी वसाहतीमध्ये जाऊन अनेकांना जीव गमवावा लागला होता. यानंतरही इंदिरानगर परिसरामध्ये नाल्यामध्ये वाहून गेल्याने नागरिकांचा जीव गेला होता. नैसर्गिक नाल्यांचे संरक्षण करण्यासाठी ठोस योजनाच नसल्यामुळे नाल्यांच्या काठावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. एमआयडीसीमध्ये काही ठिकाणी कारखान्यांना भूखंड देण्यासाठी प्रवाह बदलण्यात आले आहेत. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकल्याने पात्र अरुंद झाले आहे. अतिक्रमणामुळे पावसाळ्यात नाल्यातील पाणी रोडवर व वसाहतीमध्ये जाऊ लागले आहे. माजी महापौर सुधाकर सोनावणे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी वेळोवेळी हा मुद्दा महापालिकेच्या सर्वसाधारण व इतर सभांमध्ये उपस्थित केला होता. महापालिकेने दहा वर्षांपूर्वीच एकत्रित नाला व्हिजनची योजना तयार करून जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. नगरसेवकांनी नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्याची मागणी केल्यानंतर नाला व्हिजनअंतर्गत कामे केली जाणार असल्याचे सांगितले जात होते; परंतु जेएनएनयूआरएमने नाला व्हिजनची योजना नाकारल्यामुळे पालिकेला स्वत:च्या निधीमधून हे काम करावे लागणार आहे.एमआयडीसीमध्ये बोणसरी, इंदिरानगर, दिघा, चिंचपाडा, सुभाषनगर, इलठाणपाडा व इतर अनेक ठिकाणी नाल्यांच्या बाजूला वसाहती आहेत. यापैकी फक्त इंदिरानगरमध्ये तेथील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून नाल्याला संरक्षण भिंत बांधून घेतली आहे. इतर ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात आलेली नाही. परिणामी, पावसाळ्यात पूरसदृश स्थिती निर्माण होत आहे. एमआयडीसीमध्ये दोन ठिकाणी नाल्यावर कंपनी उभी राहिली आहे. नैसर्गिक नाला बुजवून त्यावर बांधकाम केल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होत नाही. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व नैसर्गिक नाल्यांचे संरक्षण व देखभालीसाठी धोरण नसल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. लवकर याविषयी ठोस निर्णय न घेतल्यास त्याचा फटका रहिवाशांना बसणार आहे.चिंचपाड्याचा प्रस्ताव तयारमहापालिका प्रभाग-८ मधील मनपा शाळा क्रमांक ५३ ते रिलायबल कंपनीपर्यंत नाल्यातील पाणी प्रत्येक वर्षी वसाहतीमध्ये जात आहे. जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेते विजय चौगुले व नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी नाल्याला संरक्षण भिंत बांधण्यात यावी, यासाठी मागणी केली आहे. प्रशासनाने सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्याप हा ठराव सभेपुढे आलेला नाही. यामुळे लोकप्रतिनिधींसह नागरिकांमध्ये असंतोष असून, अशीच स्थिती राहिल्यास आंदोलनाचा इशारा नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी दिला आहे. पालिकेला साकडेनेरुळ एमआयडीसीमधील बोणसरी झोपडपट्टीमध्येही प्रत्येक वर्षी पावसाचे पाणी शिरत आहे. शिवसेनेच्या वतीने वारंवार महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. शाखाप्रमुख महेश कोठीवाले, मोहम्मद शेख, महेबूब पटेल, सागर मनगूतकर, शांताराम गावई, मुबारक चुगींवाले, कल्मेश मनगूतकर, मिलन दास, राजू मोडके, जलील चुगींवाले, हितेश जाधव यांनी यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला आहे.प्रवाह बदललाएमआयडीसीमध्ये दोन कंपन्यांनाना नैसर्गिक नाल्याच्या दोन्ही बाजूचा भूखंड दिला आहे. कंपनीने नैसर्गिक नाला बुजविला आहे. नाल्यावर बांधकाम केले असून, आकार कमी केला आहे. याविषयी एमआयडीसीकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतलेली नाही.