शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नवीमुंबई विमानतळ नामकरण; दिरंगाईमुळे कृती समितीमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2023 20:18 IST

आगरी समाजातील आजी-माजी आमदारांची लवकरच बैठक बोलावण्याचा निर्णय: आंदोलनासाठी तयारी करण्याचे आवाहन 

मधुकर ठाकूर, उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा केलेला ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्य सरकारने वर्ष उलटून गेले तरी केंद्र सरकारकडे पाठविलेला नाही.  तो केंद्राकडे पाठवून त्यावर लवकर कार्यवाही करण्यासाठी आगरी व तत्सम समाजातील सर्व आजी माजी आमदारांची बैठक येत्या काही दिवसांत बोलावली जाईल. त्यात आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. त्यानंतर सर्व आमदारांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे शनिवारी जासई येथे बोलाविण्यात आलेल्या ठरविण्यात आले आहे.

लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या मुंबई, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांची सभा शनिवारी (३०) जासई ‘दिबां’च्या जन्मगावी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी अनेक वक्त्यांनी शासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात नाराजी व्यक्त केली. 

काँग्रेसचे संतोष केणे यांनी सांगितले की, आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे, परंतु अजूनही काही होत नाही. येथे दुसर्‍या कुणाच्या नावाची चर्चा तर नाही ना? कम्युनिष्ट पक्षाचे कॉ. भूषण पाटील म्हणाले की, लढ्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. सरकारला जाग आणण्यासाठी आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही.भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, कृती समितीशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ द्यावी, असे पत्र त्यांना  दिले आहे. दुसर्‍या कुणाच्या नावाचा विचार झाल्यास तीव्र आंदोलन होईल असेही ते म्हणाले. माजी खासदार संजीव नाईक यांनी आमदार गणेश नाईक यांच्या सुचनेनुसार या प्रश्नी सर्व आगरी आमदारांची लवकरच बैठक बोलावून त्यात विचारविनिमय करून मुख्यमंंत्री, उपमुख्यमंंत्र्यांशी भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावता येईल, असे सांगितले. त्यावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि दशरथ पाटील यांनी लगेच आमदार गणेश नाईकांंशी फोनवर चर्चा करून सर्व आजी माजी आमदारांच्या बैठकीचा निर्णय घेण्यात आला.   लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, आंदोलन करण्यासाठी प्रथम वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. त्याकरिता प्रत्येक कार्यकर्त्याने जागृत राहून आपापल्या विभागात काम केले पाहिजे.

अध्यक्ष दशरथ पाटील म्हणाले की, सरकारला आपली ताकद दाखविण्यासाठी आंदोलन सुरुच ठेवले पाहिजे, तरच आपल्याला न्याय मिळेल, पण त्या अगोदर चर्चा करून काही मार्ग निघतो का हे पहावे लागेल. या वेळी पंचमहाभूत भूमिपुत्र फाउंडेशनचे सुशांत पाटील, गणेश पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.   या बैठकीस अतुल पाटील, जे.एम.म्हात्रे, विनोद म्हात्रे, विजय गायकर, मनोहर पाटील, सुरेश पाटील, सुनील कटेकर, रूपेश धुमाळ, किशोर घरत, दीपक पाटील, संतोष घरत, रघुनाथ पाटील, अनिल चिकणकर, आदित्य घरत, संजय घरत, पूजा कांबळे, योगिता म्हात्रे, वंदना घरत, शैलेश घाग, यांच्यासह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबई