शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत नसणाऱ्यांची नावेही मतदार यादीमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 03:53 IST

२०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदार संघामध्ये अटीतटीची लढत झाली होती.

नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ सुरू आहे. १४ हजार नागरिकांची दुबार नावे असून, जिवंत नसलेल्या २५ हजार नागरिकांचे नाव मतदारयादीमध्ये असल्याचे निदर्शनास आले असून याविषयी शिवसेनेने आवाज उठविला आहे.२०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदार संघामध्ये अटीतटीची लढत झाली होती. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या मतदार संघामध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रत्येक मताला महत्त्व असल्यामुळे मतदार नोंदणीबरोबर बोगस मतदारांची नावे कमी करण्यावरही भर दिला जात आहे. शिवसेनेने महापालिकेच्या वार्डनिहाय याद्यांची छाननी करण्यास सुरुवात केली असून शहरामध्ये तब्बल १४ हजार मतदारांची दोन वेळा नावे आली असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय शहरात यापूर्वी मृत्यू झालेल्या २५ हजार नागरिकांची नावे मतदार यादीमध्येच असल्याचे स्पष्ट झाले आहे.शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, ज्ञानेश्वर सुतार, विशाल ससाणे, सरोज पाटील, रोहिदास पाटील, समीर बागवान यांनी सहायक आयुक्त तुषार मटकर यांची भेट घेतली. दुबार नावे तत्काळ वगळण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी शिवसेनेने दिला. मतदार याद्यांमधील घोळ सुधारण्याचे आश्वासन या वेळी तुषार मटकर यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक