शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
4
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
6
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
7
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
8
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
9
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
10
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
11
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
12
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
13
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
14
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
15
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
16
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
17
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
18
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
19
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
20
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले

गणेशोत्सव मंडळाबाहेर नमाज

By admin | Updated: September 26, 2015 01:17 IST

कोपरखैरणे सेक्टर १० मधील श्री गणेश मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाच्या आवारामध्ये शुक्रवारी मुसलमान बांधवांनी बकरी ईदची नमाज अदा केली

नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर १० मधील श्री गणेश मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाच्या आवारामध्ये शुक्रवारी मुसलमान बांधवांनी बकरी ईदची नमाज अदा केली. गणेश मंडळाचे कार्यकर्ते व मुस्लीम बांधवांनी सामाजिक सलोखा व एकात्मतेचा आदर्श निर्माण केला. यावेळी गणेशोत्सव व बकरी ईद एकाच वेळी आली आहे. यावेळी शहरात अनेक ठिकाणी मुस्लीम बांधवांनी सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये सहभाग घेतला होता. शुक्रवारी ईदनिमित्त नमाज अदा करण्यासाठी कोपरखैरणे सेक्टर १० मधील मुस्लीम बांधवांना योग्य जागा उपलब्ध होत नव्हती. त्यावेळी कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष वैभव नाईक व मुस्लीम समाजातील नागरिकांची समन्वय बैठक घेतली व गणेश मंडळाच्या बाहेरील जागेवर नमाज अदा करावी असे आवाहन केले. सामाजिक सलोखा व एकात्मतेचे दर्शन घडविण्यासाठी सर्वांनी यास सहमती दिली. सकाळी गणेशोत्सव मंडळाच्या बाहेर नमाज अदा करण्यात आली. या उपक्रमाचे शहरातील सर्व नागरिकांनी स्वागत केले आहे. कोपरखैरणेमध्ये राबविण्यात आलेला हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केली आहे. ईद निमित्त शहरात सर्व मुस्लीम बांधवांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून कुठेही रोडवर नमाज अदा केली नाही. एपीएमसीमध्येही रोडऐवजी लिलावगृहामध्ये नमाज अदा केली. पोलीस अधिकाऱ्यांनीही यासाठी गणेश मंडळ व मुस्लीम बांधवांचे आभार मानले असून सर्वांचे अभिनंदनही केले आहे. (प्रतिनिधी)