शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नालेसफाईला मुहूर्त मिळेना

By admin | Updated: May 12, 2017 01:58 IST

पनवेल महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे अद्याप मान्सूनपूर्व

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे अद्याप मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना सिडकोच्या वतीने अद्याप मान्सूनपूर्व कामांना सुरुवात झाली नसल्याने नागरिकांमधे नाराजी आहे. एकीकडे शहरातील गटारे, नाल्यांची सफाईची कामे शिल्लक आहेत तर दुसरीकडे प्रचाराच्या धामधुमीत राजकीय नेत्यांकडूनही नागरिकांच्या आरोग्याशी निगडित प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. साधारण ७ जूनला मान्सूनचे आगमन होते. त्यापूर्वी सिडको प्रशासनाकडून मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे होणे अपेक्षित असते. मात्र अद्याप काम सुरूच न झाल्याने ते पूर्ण होणार कधी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शहरात सेक्टर १२, १०, २, १५, २१, १३ याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. दरवर्षी ही कामे मे अखेरीस पूर्णही केली जातात. मात्र अद्याप ही कामे हाती घेतली नसल्याने सिडको प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. शहरात काय ठिकाणी गटारे भरल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. खारघर सेक्टर १० मधील हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे. तक्रार करून देखील दखल घेतली नसल्यामुळे रहिवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.