शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

‘नैना’ला चार वर्षांत मिळणार कोंढाणेचे ४०० एमएलडी पाणी; विस्थापित गावांचे होणार पुनर्वसन

By कमलाकर कांबळे | Updated: August 12, 2024 13:03 IST

धरणाचे काम पूर्ण करण्याचा सिडकोचा निर्धार; २००७ पासून रखडपट्टी

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: कथित सिंचन घोटाळ्यामुळे दीर्घकाळ रखडलेल्या रायगड जिल्ह्यातील कोंढाणा धरणाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या कामाचे कार्यादेश देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. कोंढाणे धरणामुळे सिडकोच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या नैना क्षेत्रातील शहरांची तहान भागविता येणार आहे. पुढील चार वर्षांत हे धरणाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सिडकोने ठेवले आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ४०० एमएलडी करण्याची योजना आहे.

उल्हास नदीवर कोंढाणे धरण आहे. २००७ पासून धरणाचा विस्तार रखडला. २०१७ मध्ये धरण सिडकोकडे हस्तांतरित झाले.तांत्रिक अडचणींमुळे धरणाचे काम रखडले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी धरण बांधकामांसाठी ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. 

विस्थापित गावांचे होणार पुनर्वसन

कर्जत तालुक्यातील उल्हास  नदीवर कोंढाणे गावात ४०० हेक्टर जागेवर कोंढाणे धरण विकसित केले जाणार आहे. या धरणाची उंची  ८० मीटर इतकी असणार आहे.  ज्यामध्ये संपूर्ण जलाशय पातळी उंचावर आहे. प्रस्तावित धरणामुळे कोंढाणे आणि चोची ही दोन गावे विस्थापित होणार आहेत. या गावांतील ११८ कुटुंबांना सुमारे आठ किलोमीटर अंतरावर स्थलांतरित केले जाणार आहे. बाधित झालेल्या इतर गावांमध्ये उदेवाई, कुणे आणि नांदगाव यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सिडकोने गावांच्या पुनर्वसनाचा आराखडाही तयार केला आहे.

प्रकल्पाचा खर्च वाढला

कोंढाणे धरणाची सध्याची पाणीसाठवण क्षमता १०५ एमएलडी इतकी आहे. त्यात वाढ करून ती ४०० एमएलडी करण्याची योजना आहे. धरण हस्तांतरित झाले त्यावेळी म्हणजेच सात वर्षांपूर्वी सिडकोने या कामाचा खर्च एक हजार कोटी रुपये निर्धारित केला होता. यात आता ४०० ते ५०० कोटींनी  वाढ झाल्याचे समजते.

नैना क्षेत्रातील शहरांसाठी नियोजन

  • सिडकोच्या माध्यमातून नैना क्षेत्राचा विकास केला जात आहे. पहिल्या टप्प्यातील  २३ गावांच्या ३७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या परिघात १२ नगररचना परियोजनेच्या (टीपीएस) माध्यमातून १२ शहरे वसविली जाणार आहेत.
  • त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील ७३ गावांचा सर्वसमावेशक विकास केला जाणार आहे. नैनाच्या पहिल्या टप्प्यात सिडकाेने पायाभूत सुविधांची कामे सुरू केली आहेत. जवळपास साडेसहाशे कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव मागविले आहेत. त्याचबरोबर पाण्याचेसुद्धा नियोजन सुरू केले आहे.  
  • कोंढाणे धरणामुळे नैना क्षेत्रातील नियोजित शहरांचा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे.  नैना क्षेत्रातील नियोजित शहरांची पुढील  वीस वर्षांतील संभाव्य लोकसंख्येला पुरेल इतका पाणीसाठा या धरणातून उपलब्ध होणार आहे.
टॅग्स :DamधरणNavi Mumbaiनवी मुंबई