शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपध्दतीवर नाईक नाराज

By admin | Updated: September 12, 2016 03:29 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपध्दतीवर माजी मंत्री गणेश नाईक यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. प्रशासनाचा कारभार हुकुमशाहीच्या दिशेने सुरू आहे

नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपध्दतीवर माजी मंत्री गणेश नाईक यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. प्रशासनाचा कारभार हुकुमशाहीच्या दिशेने सुरू आहे. त्याविरोधात वेळप्रसंगी आंदोलन करावे लागले तरी चालेल, असे संकेत नाईक यांनी दिले आहेत. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यापाठोपाठ आता नाईक यांनीही आयुक्तांच्या कार्यपध्दतीवर नाराजी प्रकट केल्याने येत्या काळात हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.अत्तपर्यन्त भाजप याविरोधात उतरले होते, तोपर्यंत राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा गणेश नाईक किंवा आमदार संदीप नाईक हे गप्प बसून होते आज प्रथमच गणेश नाईक देखील यांनी याविरोधात आंदोलन करण्याचे सूतोवाच केले,गणेश नाईक यांच्या वाढिदवसा निमित्त राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने ब्लड डोनर चेन या कार्यक्र माचा शुभारंभ केला आहे. कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक हायस्कूलमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमा नाईक यांच्या हस्ते या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. प्रशासनाच्या मनमानी कराभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. ही हिटलरशाही लोकशाहीला घातक आहे. त्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू.प्रसंगी जेलमध्ये जावे लागले तरी चालेल, परंतु जनतेवर अन्याय करणारी हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा नाईक यांनी दिला आहे. आयुक्त मुुंढे यांचे नाव न घेता त्यांच्या कार्यपध्दतीवर नाईक यांनी पहिल्यांदाच जाहिर नाराजी प्रकट केली आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्याला वेगळे महत्व आहे. विशेष म्हणजे भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी यापूर्वीच मुंढे यांच्या विरोधात कंबर कसली आहे. आता यात नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांनीही अप्रत्यक्ष उडी घेतल्याने येत्या काळात आयुक्त मुंढे यांची कसोटी लागणार आहे. (प्रतिनिधी)