शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मसाला व्यापाऱ्यांची झुंडशाही

By admin | Updated: May 27, 2016 02:32 IST

मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांना अतिरिक्त एफएसआय देण्याचा ठराव बाजार समितीने केला आहे. परंतु सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु वास्तवामध्ये वाढीव एफएसआय

नामदेव मोर, नवी मुंबई मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांना अतिरिक्त एफएसआय देण्याचा ठराव बाजार समितीने केला आहे. परंतु सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु वास्तवामध्ये वाढीव एफएसआय म्हणजे बांधकाम परवानगी मिळाली असा होत नाही. धनाढ्य व्यापाऱ्यांनी बिनधास्तपणे नियम धाब्यावर बसवून बाजार समिती प्रशासनाला खूश करत अतिक्रमणाचे इमले उभे केले असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले आहे. देखभाल शाखेचे अधिकारी व सुरक्षा रक्षकांच्या मदतीने उभारलेल्या वाढीव मजल्यांवर महापालिकेने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. परंतु व्यापाऱ्यांनी मार्केट बंद करून कारवाईला विरोध केला. व्यापाऱ्यांची झुंडशाही पालिका आयुक्त मोडीत काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. कोणत्याही स्थितीमध्ये विनापरवाना बांधकामांना अभय दिले जाणार नाही. विभाग अधिकाऱ्यांनी कोणास पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे शहरातील सर्वच भूमाफिया व अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. महापालिकेने मागील २४ वर्षांमध्ये एमआयडीसीपासून गावठाणापर्यंत अनेक ठिकाणी कारवाई केली. परंतु मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनधिकृत बांधकामांवर कधीच कारवाई केली नाही. बाजारसमितीनेही स्वतंत्र संस्थान असल्याप्रमाणे पालिकेची परवानगी न घेताच मोठ्या प्रमाणात बांधकाम केले आहे. व्यापाऱ्यांनी त्यांच्या गाळ्यावरील एक मजला वाढविला आहे. या धनाढ्य व्यापाऱ्यांचा राजकीय वशिला असल्यामुळे व प्रचंड पैशामुळे आतापर्यंत कारवाई होत नव्हती. परंतु विद्यमान आयुक्तांनी त्यांचे वाढीव मजले तोडण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. १६ मे रोजी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मसाला मार्केटमध्ये मोहीम हाती घेतली होती. परंतु व्यापाऱ्यांनी कारवाईला विरोध केला. आम्ही वाढीव एफएसआय घेतला आहे. त्यासाठी बाजार समितीला पैसे भरले असल्याचे त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना सांगितले. यानंतरही अधिकारी ऐकत नसल्याने दुकानांचे शटर बंद करून कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. मसाला मार्केटमधील व मार्केटबाहेरील नवी मुंबई मर्चंट चेंबरच्या इमारतीमधील दुकानदारांनी अतिक्रमण वाचविण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. बाजार समिती प्रशासनाकडे बैठक घेवून आम्ही एफएसआयसाठी पैसे भरले आहेत. यानंतरही कारवाई का केली जात आहे, असा जाब विचारला. आम्ही बांधकाम करताना ते एफएसआयमध्ये नियमित करून मिळेल असे स्वप्न दाखविले होते. सुरक्षा रक्षक व देखभाल शाखेच्या सहमतीनेच बांधकाम झाल्याचे स्पष्ट केले आहे. राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीने अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू केली आहे. वास्तविक बाजार समितीच्या प्रत्येक मार्केटला संरक्षण भिंत आहे. प्रत्येक आवक व जावक गेटवर चोवीस तास बाजार समितीचे सुरक्षा रक्षक व गेटवरील कर्मचारी असतात. यानंतरही अनधिकृत बांधकामे झालीच कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अभियंते, सुरक्षा अधिकारी जबाबदारमसाला मार्केटमधील जवळपास सर्वच व्यापाऱ्यांनी त्यांच्या गाळ्यामध्ये अनधिकृत बांधकाम केले आहे. काहींनी पोटमाळा काढला असून काहींनी चक्क वाढीव मजल्याचे काम केले आहे. वाढीव बांधकाम करताना बाजार समिती व महापालिकेची परवानगीच घेतलेली नाही. देखभाल शाखेचे अभियंते व कर्मचाऱ्यांसह सुरक्षा कर्मचारी आणि गेटवरील कर्मचाऱ्यांना खूश करून बांधकाम साहित्य आतमध्ये नेवून बांधकाम केले जात आहे. गेटवरून बांधकाम साहित्य आतमध्ये सोडलेच नसते तर अतिक्रमण झाले नसते. यामुुळे या प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. झुंडशाहीची जुनी सवय मसाला मार्केटमधील व्यापारी नियम धाब्यावर बसवून अनेक कामे करत आहेत. यापूर्वी बाजार समितीचे अधिकारी सेस वसुलीसाठी किंवा दप्तर तपासणीसाठी गेले की व्यापारी गाळे बंद करून गोंधळ घालतात. मार्केटचे कामकाज थांबवून गोंधळ सुरू झाला की पालिकेचे अधिकारी परत जातात. यामुळे आतापर्यंत करोडो रुपयांचा महसूल बुडविला आहे. अतिक्रमण वाचविण्यासाठी तीच पद्धत अवलंबली जात असली तरी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिल्याने ही झुंडशाही मोडीत निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.