शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मानापमानाच्या नाट्याने गाजली पनवेलची महासभा , महापालिका प्रशासनावरही नगरसेवकांचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 02:42 IST

पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी वासुदेव बळवंत नाट्यगृहात पार पडली. महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत ही महासभा सुरू झाली. दुपारी २ वाजता सुरू झालेली ही सभा मानापमानाच्या नाट्यातच गाजली.

वैभव गायकर।पनवेल : पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी वासुदेव बळवंत नाट्यगृहात पार पडली. महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत ही महासभा सुरू झाली. दुपारी २ वाजता सुरू झालेली ही सभा मानापमानाच्या नाट्यातच गाजली.विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न प्रशासन इतिवृत्तात घेत नाही आणि तेच विषय पुढच्या महासभेच्या सत्ताधाºयांच्या नावानी नोंद केले जात असल्याने विरोधकांनी घोषणाबाजी करीत सभात्याग केला. सत्ताधाºयांनी महापालिकेच्या लोगोच्या अनावरणच्या कार्यक्र माला आमदारांना निमंत्रण दिले नसल्याने बराच वेळ गोंधळ घातला. या मानापमानाच्या नाट्यात बराच वेळ वाया गेला.विरोधीपक्षाचे सदस्य हरेश केणी, गुरु नाथ गायकर, अरविंद म्हात्रे, अजीज पटेल, प्रीतम म्हात्रे, अरविंद म्हात्रे, बबन मुकादम हे जोरदार घोषणाबाजी करीत सभागृहाबाहेर पडले. महापालिका प्रशासनाच्या वतीने विश्वासात घेतले जात नाही, तसेच उपस्थित प्रश्नांची दखल घेतली जात नाही. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असे गंभीर प्रश्न इतिवृत्तात समाविष्ट केले जात नसून, सत्ताधारी आम्ही मांडलेले प्रश्न कॉपी करीत असल्याचा आरोप या वेळी विरोधकांनी केला. शेकापचे गटनेते प्रीतम म्हात्रे यांनीही सत्ताधाºयांवर विषय चोरले जात असल्याचे आरोप केले.पनवेल महापालिकेच्या लोगोच्या अनावरण कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांना आमंत्रित केले नसल्याने भाजपाचे गटनेते परेश ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली. पनवेल महापालिकेच्या लोगोच्या अनावरणासंदर्भात आयोजित कार्यक्रमाची कोणतीच माहिती पालिका प्रशासनाने दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. पनवेल महापालिका प्रशासन कोणतेही कार्यक्र म आयोजित करीत असताना सत्ताधाºयांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.या वेळी नगरसेवक प्रकाश बिनेदार, जगदीश गायकवाड यांनी पालिकेच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. आमदार प्रशांत ठाकूर यांचे पनवेल महापालिकेच्या उभारणीला मोठे योगदान असल्याचे बिनेदार यांनी सांगितले. या वेळी आयुक्तांनी सारवासारव करीत पालिका प्रशासनातर्फे सर्वांनाच या कार्यक्र माचे आमंत्रण देण्यात आल्याचे सांगितले.पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या अनेक समस्याच भेडसावत असताना सत्ताधारी आणि विरोधकांच्या वेळकाढू धोरणामुळे महत्त्वाच्या प्रश्नांवर महासभेत चर्चा न झाल्याने पनवेलकरांनी नाराजी व्यक्त केली.विशेष म्हणजे, १ आॅक्टोबर रोजी सिडकोकडून महापालिकेकडे आरोग्य सेवा हस्तातंरण करण्यात येणार आहे. विरोधक सभागृहात उपस्थित नसल्याने या महत्त्वपूर्ण विषयावर योग्य ती चर्चा होऊ शकली नाही.पालिकेच्या सभागृह नेतेपदी परेश ठाकूर यांची निवड करण्यात आली. विरोधकांच्या सभात्यागामुळे विरोधीपक्ष नेतेपदाची निवड लांबणीवर पडली. या पदावर प्रीतम म्हात्रे यांची निवड अंतिम झाल्याचे शेकापच्या सूत्रांनी सांगितले>पनवेलमध्ये पाण्याच्या टाक्या उभारणारपनवेल शहरात महापालिकेच्या वतीने जलकुंभ उभारण्यात येत आहेत. हे काम अत्यंत कासव गतीने सुरू आहे. तसेच शहरातील पाणी पुरवठा करणारे अधिकारी कामात दिरंगाई करीत असल्याने त्यांना सक्त ताकीद देण्याची मागणी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी केली.>सिडको वसाहतीमधील कामे रखडलीपनवेल महापालिकेत समाविष्ट सिडको परिसरातील कोणत्याच नगरसेवकाचे काम पालिकेमार्फत होत नाही. सिडकोकडे गेल्यावर पालिकेकडे बोट दाखविले जाते, तर पालिका सिडको प्रशासनाकडे बोट दाखवत आहे. अशा परिस्थितीत कामे कशी होणार? असा प्रश्न निलेश बाविस्कर यांनी उपस्थित केला.>खारघरमधील पाणीप्रश्न गंभीरखारघर शहरातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रहिवाशांना टँकरच्या पाण्यासाठी लाखो रु पये अदा करावे लागत आहेत. वर्षभरात सिडकोवर आम्ही १८ मोर्चे काढूनदेखील परिणाम झाला नसल्याचे नगरसेविका लीना गरड यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिकेसोबत बोलणी करून खारघरला अतिरिक्त पाणीपुरठा करावा, अशी मागणी गरड यांनी केली. या वेळी नगरसेवक समीर ठाकूर, नगरसेवक मनोज भुजबळ यांनीदेखील नवीन पनवेलमधील पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. या वेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकासोबत बैठक घेतली जाईल, असे आयुक्तांनी नगरसेवकांना सांगितले.>महत्त्वाच्या विषयावर चर्चाप्रभाग सहामधील नगरसेवक अ‍ॅड. नरेश ठाकूर यांनी खारघरमधील मोकाट कुत्र्यांच्या विषयाची लक्षवेधी मांडली. कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक रस्त्यावर फिरू शकत नसून, शालेय विद्यार्थी व लहान मुलांच्या जीवास धोका असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. यासंदर्भात आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सिडकोसोबत पाठपुरावा करून आरोग्य विभागाला योग्य ते निर्देश दिले जातील, असे उत्तर दिले.