शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियानाला महापालिकेचाच हरताळ; उद्यानातील कचरा प्रक्रिया बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 23:38 IST

नवी मुंबईत फक्त अभियान काळापुरतीच कचऱ्यातून खतनिर्मिती

नवी मुंबई : स्वच्छता अभियनांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक उद्यानात कंपोस्ट पीट तयार केले होते. कचºयातून खतनिर्मिती करून त्याचा उद्यानातच वापर केला जात होता, परंतु सद्यस्थितीमध्ये अपवाद वगळता, सर्वच उद्यानातील कचºयावरील प्रक्रिया बंद झाली असून, कंपोस्ट पीटची दुरवस्था झाली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छता अभियानामध्ये देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, परंतु प्रत्यक्षात स्वच्छता अभियानाला महानगरपालिकेनेच हरताळ फासल्याचे चित्र शहरात दिसत आहे. ओल्या कचºयाची निर्मितीच्या ठिकाणीच विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना कचºयातून खतनिर्मिती करणे बंधनकारक केले होते. मनपाने स्वत: सर्व उद्यानामध्ये कंपोस्ट पीट तयार केले होते. उद्यानातील कचºयावर तेथे प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जात होती. निर्माण झालेले खत त्याच ठिकाणी वापरले जात होते. अभियान काळात सर्वेक्षणासाठी आलेल्या केंद्र सरकारच्या टीमलाही हा प्रयोग दाखविण्यात आला होता, परंतु अभियान संपताच उद्यानांमधील खतनिर्मिती पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. महापालिका स्वच्छता अभियानापुरतीच प्रयोग राबविते अशी टीका नागरिकांनी केली आहे.नागरिक नाराजसद्यस्थितीमध्ये प्रत्येक उद्यानातील कंपोस्ट पीटमधील कचºयाची माती झाली आहे. काही ठिकाणी खरोखरच पीटमध्ये माती टाकण्यात आली आहे. कंपोस्ट पीटची दुरवस्था झाली असून, देखभालही केली जात नाही. यामुळे उद्यानात फिरण्यासाठी येणाºया पर्यावरणप्रेमी नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका