शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत मृत्युदर रोखण्यास पालिकेचे प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 23:51 IST

गंभीर रुग्णांकडे लक्ष देण्याचे निर्देश : कंटेन्मेंट झोनवर दिले विशेष लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरातील कोरोनाबळींची संख्या चारशेपेक्षा जास्त झाली आहे. यापुढे कोरोनामुळे कोणाचा ही मृत्यू होणार नाही, यावर लक्ष केंद्रित करा. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्यात यावे. कोणत्याही स्थितीत मृत्युदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.शहरातील हॉटस्पॉट क्षेत्रात घरोघरी स्क्रिनिंग करून अधिक प्रभावी रीतीने रुग्ण शोधमोहीम राबविण्यास व त्यामध्ये लक्षणे आढळणाºया नागरिकांची अँटिजेन टेस्टिंग करण्यास मनपाने सुरुवात केली आहे. त्यामुळे आज जरी रुग्णसंख्या वाढलेली दिसली, तरी कोरोनाबाधित व्यक्ती लवकर समजल्याने त्याच्यामुळे पुढे वाढू शकणारा संसर्ग त्याचे त्वरित विलगीकरण करून वेळेतच रोखण्यात यशस्वी होता येईल, असा विश्वास मनपा आयुक्तांनी व्यक्त केला आहे. त्यांनी नेरुळ विभागाचा आढावा घेताना अधिकाºयांना गंभीर रुग्णांकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले. प्रत्येक वैद्यकीय अधिकाºयांनी आपल्या क्षेत्रातील गंभीर स्थिती असलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांच्या, तसेच तो रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयाच्या संपर्कात दूरध्वनीद्वारे दिवसातून किमान एक वेळ राहावे, अशा सूचना आयुक्तांनी वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिक, तसेच मधुमेह, हाय ब्लडप्रेशर, हृदयरोग अशा इतर आजार असणाºया व्यक्तींकडेही काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या क्षेत्रातील एकही कोरोनाबाधित रुग्ण दगावता कामा नये, हे आपले ध्येय असले पाहिजे, अशा शब्दांत वैद्यकीय अधिकाºयांना सूचित केले.कंटेन्मेंट झोन निश्चित करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे. त्यासोबतच विशेषत्वाने ज्या भागात पाचपेक्षा अधिक कोरोनाबाधित सापडतात, असे तिसºया श्रेणीचे कंटेन्मेंट झोन निश्चित करताना त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती व प्रशासकीय व्यवस्थापन याचा सुयोग्य ताळमेळ ठेवला पाहिजे. कंटेन्मेंट झोनचे उद्दिष्ट सफल होईल, याचा तारतम्याने विचार करावा, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. कंटेन्मेंट झोन तयार करताना अत्याधुनिक गुगल मॅप पद्धतीचा प्रभावी वापर करावा, असेही त्यांनी सूचित केले. कंटेन्मेंट झोन जाहीर करताना त्या ठिकाणी पूर्णत: प्रवेश प्रतिबंधित करणे गरजेचे असल्याचे सांगत, आयुक्तांनी तेथील नागरिकांना औषधे, भाजीपाला, दूध अशा जीवनावश्यक गोष्टी कशा मिळतील, याचेही विभाग कार्यालयाने नियोजन करावे, असे सांगितले. पहिल्या व दुसºया प्रकारच्या कंटेन्मेंट झोनमधील प्रतिबंधित बाबींचे पालन करण्यासाठी सोसायटी, वसाहतींचे पदाधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपवावी. तिसºया श्रेणीचे कंटेन्मेंट झोनमध्ये प्रवेशाच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवावा, असेही आयुक्तांनी निर्देशित केले. प्रत्येक कंटेनमेंट झोनच्या ठिकाणी ठळकपणे दिसेल, असा प्रतिबंधित क्षेत्राचा बॅनर प्रदर्शित करावा, अशाही स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या.खासगी डॉक्टरांच्या व्हॉट्सअ‍ॅप समूहाद्वारे रुग्ण शोध मोहिमेला गतीकोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी कोरोनाची लागण झालेली व्यक्ती लवकरात लवकर समजणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाºयांनी आपल्या क्षेत्रातील खासगी डॉक्टरांचा व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार करावा. त्यांच्याकडे येणाºया तापाच्या रुग्णांची माहिती त्वरित कळवावी व अशा व्यक्तींची अँटिजन टेस्ट त्वरित करून घ्यावी, असेही निर्देश आयुक्तांनी वैद्यकीय अधिकाºयांना दिले. खासगी डॉक्टरकडील, तसेच नागरी आरोग्य केंद्राच्या फ्ल्यू क्लिनिकमधील ताप असलेली एकही व्यक्ती अँटिजेन टेस्टशिवाय राहू नये, असे आयुक्तांनी निर्देशित केले.