शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पालिका नगररचना विभागाची चूक अतिक्रमणला भोवणार !

By admin | Updated: April 17, 2016 01:09 IST

तुर्भेमध्ये निवासी चाळीमध्ये हॉटेल व लॉजिंगसाठी केलेल्या बांधकामाला नगरचना विभागाने भोगवटा प्रमाणपत्रही दिले आहे. अतिक्रमण झाले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

नवी मुंबई : तुर्भेमध्ये निवासी चाळीमध्ये हॉटेल व लॉजिंगसाठी केलेल्या बांधकामाला नगरचना विभागाने भोगवटा प्रमाणपत्रही दिले आहे. अतिक्रमण झाले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नगररचना विभागाच्या चुकीमुळे अतिक्रमण विभागाचे काम वाढले असून, नागरिकांच्या विरोधामुळे येथील अतिक्रमण पाडावे लागणार आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला लागून तुर्भे सेक्टर २० मध्ये रोडला लागून असलेली घरे एका हॉटेल व्यावसायिकाने विकत घेतली आहेत. सर्व घरे एकत्रित करून तेथे हॉटेल व लॉजिंग सुरू करण्यासाठी सिडकोकडून वापर बदलची परवानगी मिळविली आहे. या परवानगीनंतर महापालिकेकडून बांधकाम परवानगी घेतली. पालिकेने बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना भोगवटा प्रमाणपत्रही दिले आहे. हॉटेलचालकाने दोन्ही गल्लींच्या मधील मोकळ्या जागेवरही अतिक्रमण केले आहे. पहिल्या माळ्यावर अनधिकृत बांधकाम झाले आहे. दुसरा मजला पूर्णपणे अनधिकृत आहे. हॉटेल व लॉजिंगमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने उभी करण्यासाठी जागाच नाही. असे असतानाही संबंधितांना बांधकामाची व बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिलेच कसे, असा प्रश्न रहिवाशांनी विचारला आहे. नगररचना विभागाने नियम डावलून केलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. नगरचना विभागाने भोगवटा प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने दिल्याचे रहिवाशांनी निदर्शनास आणून दिले आहे. यानंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने या हॉटेलमालकास नोटीस दिली आहे. दुसऱ्या मजल्यावर अतिक्रमण केले असून दोन्ही गल्ल्यांमधील सार्वजनिक वापराच्या जागेचाही अनधिकृतपणे वापर केला असून, सदर अतिक्रमण तत्काळ काढून टाकण्याची सूचना केली आहे. परंतु फक्त नोटीस देऊन काहीही उपयोग नाही. प्रत्यक्षात अतिक्रमण हटविण्यात यावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. (प्रतिनिधी)