शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

गुणाले तलावाच्या स्वच्छतेबाबत महापालिका आयुक्त नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:19 IST

घणसोलीत पाहणी दौरा : सिडकोच्या मोकळ्या भूखंडावरील अस्वच्छता दूर करण्यासाठी पाठपुरावा करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ ला सामोरे जाताना स्वच्छता आणि सुशोभीकरणाद्वारे नवी मुंबई शहराचे स्वरूप अधिक चांगले करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या स्वच्छता कार्याची पाहणी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी घणसोली विभागामधील विकसित नोड, गांव - गावठाण, झोपडपट्टी तसेच एम.आय.डी.सी. क्षेत्र अशा सर्व भागांत फिरून केली. नाल्यांमध्ये कचरा टाकला जाऊ नये याकरिता नाल्यांच्या काठावर ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या संरक्षक जाळ्या रस्त्यांपासून काहीशा वर असल्यामुळे त्यामध्ये असलेले अंतर भरून काढावे, असे निर्देश दिले. 

घणसोलीतील गुणाले तलावाचा जलाशय तितकासा स्वच्छ नाही. तसेच त्याशेजारील कंपोस्ट पिट कार्यान्वित नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत कार्यवाही करण्याचे निर्देश  दिले. घणसोली विभागाच्या विकासाला सर्वांत शेवटी सुरुवात झाली असल्याने तेथील विकास प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सिडकोचे भूखंड पडून आहेत. अशा मोकळ्या भूखंडांवरील अस्वच्छता दूर करण्यासाठी सिडकोकडे सुरू असलेला पाठपुरावा अधिक तीव्रतेने करून हे भूखंड स्वच्छ करून घ्यावेत, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. रबा‌ळे एम.आय.डी.सी. भागात मोठ्या प्रमाणावर रस्ते, पदपथ यांची कामे सुरू असून अनेक ठिकाणी आच्छादनाच्या हिरव्या जाळ्या दिसून येत नाहीत, याबाबत संबंधितांकडून तातडीने कार्यवाही करून घ्यावी व त्या ठिकाणचे डेब्रिजही व्यवस्थित ठेवले जावे, असे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे एम.आय.डी.सी. क्षेत्रात मुख्य रस्त्यांवर विविध ठिकाणी पडलेले बांधकाम व पाडकाम डेब्रिज उचलण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यामध्ये उपायुक्त दादासाहेब चाबूकस्वार, घणसोली विभागाचे सहायक आयुक्त संजय तायडे आणि स्थापत्य विभागाचे उप अभियंता रमेश गुरव उपस्थित होते. 

नवी मुंबईकरांनी तसेच एम.आय.डी.सी. क्षेत्र व इतर ठिकाणी व्यवसाय व कामानिमित्त येणाऱ्या इतर शहरात राहणाऱ्यांनी नवी मुंबई शहराचा स्वच्छ व सुंदर नावलौकिक वाढविण्यासाठी आपले संपूर्ण योगदान द्यावे.             - अभिजित बांगर,नवी मुंबई महापालिका आयुक्त. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई