शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींच्या देखभालीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 03:25 IST

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विहिरींची साफसफाई वेळच्या वेळी करण्यात येत नसल्यामुळे नवी मुंबईतील अनेक विहिरींची दुरवस्था झाली आहे. विहिरींमध्ये शेवाळ साचले असून झुडपे वाढू लागली आहेत.

- अनंत पाटीलनवी मुंबई : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विहिरींची साफसफाई वेळच्या वेळी करण्यात येत नसल्यामुळे नवी मुंबईतील अनेक विहिरींची दुरवस्था झाली आहे. विहिरींमध्ये शेवाळ साचले असून झुडपे वाढू लागली आहेत.नवी मुंबईत बेलापूर ते दिघा या एकूण आठ विभागाच्या कार्यक्षेत्रात विहिरींची एकूण संख्या ९४ आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून या विहिरींच्या साफसफाई आणि दुरु स्तीकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक विहिरींना शेवाळ आणि पानफुटी तसेच जंगली झाडांच्या लहान-मोठ्या फांद्यांनी अक्षरश: विळखा घातलेला आहे. दिघा परिसरातील अनेक विहिरींची दुरवस्था झाली असून तीच परिस्थिती घणसोली विभागात आहे.सर्वाधिक विहिरींची संख्या घणसोली गावठाण आणि झोपडपट्टी परिसरात आहेत. पावसाळ्यापूर्वी विहिरीची साफसफाई केल्याचा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केला जात असला तरी आता अनेक विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ आणि झाडांनी विळखा घातल्यामुळे विहीर आहे की डबके अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतरच विहिरींच्या साफसफाईच्या कामाला ठेकेदारामार्फत सुरु वात केली जाते. तर अनेकदा तक्र ारी करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. घणसोली येथे ब्रिटिश राजवटीपासून कार्यरत असलेल्या गुणाले तलावासमोरील वाहतुकीच्या रस्त्यालगत असलेली विहीर, बौध्दवाडी येथील तीन बावडी, गुणाले तलावाच्या मध्यभागी असलेली विहीर आणि घणसोली (चिंचआळी) येथे असलेल्या विहिरींची पार दुर्दशा झालेली आहे.नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील येत्या आठवड्यात पाहणी करून दुरवस्था झालेल्या किंवा विहिरींची साफसफाई तसेच आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा विभागाकडून विहिरींची साफसफाई केली होती, अशी माहिती कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे यांनी दिली आहे.विहिरींची आकडेवारी : बेलापूर ८, नेरूळ १२, तुर्भे १२, वाशी ३, कोपरखैरणे १३, घणसोली २१, ऐरोली १७ , दिघा ८

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका