शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

By नामदेव मोरे | Updated: September 20, 2024 05:36 IST

या वर्षीची सर्वाधिक उलाढाल एप्रिल  व  मे महिन्यांत झाल्याची नोंद झाली आहे.

नामदेव मोरे

नवी मुंबई : ‘फळांच्या राजा’चा या वर्षीचा हंगाम संपुष्टात आला आहे. फेब्रुवारी ते ऑगस्ट सात महिने ग्राहकांना हापूससह देशभरातील विविध आंब्यांचा आस्वाद घेता आला. मुंबईकरांनी तब्बल १ लाख २४ हजार ३८ टन आंबा फस्त केला असून, यातून ५०० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या वर्षीची सर्वाधिक उलाढाल एप्रिल  व  मे महिन्यांत झाल्याची नोंद झाली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत या वर्षीच्या नियमित हंगामापूर्वी ६ नोव्हेंबरला कोकणातून हापूसची पहिली पेटी दाखल झाली होती. यानंतर काही दिवसांमध्ये मलावी हापूसचीही आवक सुरू झाली होती. पहिली पेटी लवकर आली असली तरी नियमित आंब्याची आवक फेब्रुवारीपासून सुरू झाली. २०२३ मध्ये फेब्रुवारीमध्ये १८०८ टन आवक झाली होती. २०२४ मध्ये ती २५६६ टनांवर पोहोचली होती. एप्रिलमध्ये सर्वाधिक ३८ हजार ७७८ टन आवक झाली होती. ग्राहकांना ऑगस्टअखेरपर्यंत आंबा उपलब्ध होता.

मुंबई बाजार समितीमध्ये हंगामामध्ये १ लाख २४ हजार ३८ टन आंब्याची आवक झाली आहे. यामध्ये  कोकणसह कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातमधील विविध प्रकारच्या आंब्यांचा समावेश आहे. हापूस, पायरी, बदामी, लालबाग, चौसा व इतर सर्व प्रकारचा आंबा मार्केटमध्ये दाखल झाला होता. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील ग्राहकांसह येथून मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यातही करण्यात आली.

या वर्षी हंगाम ऑगस्ट अखेरपर्यंत सुरू होता. यामुळे ग्राहकांना आंब्याचा आस्वाद घेता आला. आता नोव्हेंबरमध्ये पुन्हा मलावीमधील आंबा ग्राहकांना उपलब्ध होईल.

               - संजय पानसरे,   संचालक, फळ मार्केट

आंबा हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन केले होते. वाहतूककोंडी व इतर समस्या होणार नाहीत, यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या. हंगाम उत्तम पद्धतीने पार पडला.

- संगीता अढांगळे, उपसचिव, फळ मार्केट