शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा खड्डेमय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 23:48 IST

पावसाचा जोर वाढताच महामार्गासह शहरातील खड्ड्यांची संख्या आणि आकारही वाढत असल्याचे समीकरण दरवर्षी पहायला मिळते.

पनवेल : पावसाचा जोर वाढताच महामार्गासह शहरातील खड्ड्यांची संख्या आणि आकारही वाढत असल्याचे समीकरण दरवर्षी पहायला मिळते. यंदाही परिस्थिती वेगळी नाही. पनवेल परिसरातील मुंबई-गोवा महामार्गावर तारा, पळस्पे फाटा, ओएनजीसी परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.दोन आठवड्यापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने उसळत आहेत. त्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच चारचाकी वाहनांचेही नुकसान होत आहे.पावसाळ्यापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी डागडुजी करण्यात आली होती. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. महामार्गावरील पळस्पे फाटा परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. याठिकाणाहून अवजड वाहनांचीही वर्दळ सुरू असल्याने दिवसन्दिवस खड्ड्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांचे अपघात वाढले आहेत.कोकणवासीयांसाठी मुंबई-गोवा महामार्ग महत्त्वाचा मार्ग आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महामार्गाची बरीच कामे पूर्ण झाली आहेत. तसेच रुंदीकरणाचे कामही वेगात सुरू आहे. मात्र कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने पावसाच्या सुरुवातीलाच महामार्ग खड्डेमय झाला आहे. सध्याच्या घडीला कर्नाळा, आपटा फाटा, तारा गाव आदी ठिकाणी रस्त्याची चाळण झालेली पहायला मिळते. खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा वेग आपोआपच मंदावतो.गणेशोत्सवात चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात. त्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी होऊन वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. त्यातच हा मार्ग खड्डेमय असल्यास अपघात होऊन कोंडीत आणखी भर पडते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाची त्वरित डागडुजी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.>खड्डे त्वरित भरण्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या सूचनामुंबई-गोवा महामार्ग तसेच ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे परिसरात अपघातांचे प्रमाण वाढत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे हे खड्डे त्वरित भरण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पोलादपूर शासकीय विश्रामगृहात अधिकारी व कार्यकर्त्यांशी पाटील यांनी चर्चा केली. गुजरातच्या धर्तीवर पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर क्रॅशबेअर्ससह खड्डे भरण्याचे आदेश त्यांनी दिले. ग्रामीण रस्त्याबाबत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील अटी व शर्ती सांगून ज्या गावातील लोकसंख्या एक हजाराच्या आत आहेत, त्या ठिकाणचे रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारा निधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वर्ग करण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.पनवेल महापालिका क्षेत्रासह, सिडको नोड, कळंबोली वसाहतीतही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पनवेल शहरातील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाºया रस्त्याचीही खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे.