शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-अहमदाबाद हाय वे जॅम

By admin | Updated: May 16, 2017 00:51 IST

मुंबई अहमदाबाद हायवेवरील जुन्या वरसोवा पूलावरून किती टन वजनाच्या गाड्या जाऊ शकतात याच्या निश्चितीसाठी रविवारपासून पूल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : मुंबई अहमदाबाद हायवेवरील जुन्या वरसोवा पूलावरून किती टन वजनाच्या गाड्या जाऊ शकतात याच्या निश्चितीसाठी रविवारपासून पूल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल सुरु झाले आहेत. हा पूल चार दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणारी वाहने मनोर नाका आणि चिंचोटी नाक्यावरून वळवण्यात आली आहेत. जुन्या वरसोवा पूलाला तडे गेल्याने २४ डिसेंबर २०१३ पासून हा पूल सहा महिने बंद ठेवण्यात आला होता. त्यावेळी एक गर्डर बदलून हा पूल वाहतूकीसाठी पुन्हा सुरु करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर आॅक्टोबर २०१६ ला या पुलाला तडे गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर या पूलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. या पूलावरून आॅक्टोबर महिन्यापासून फक्त हलक्या वाहनांची वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. त्यासाठी एकदिशा मार्ग सुरु ठेवण्यात आला आहे. एकेरी वाहतूक वीस मिनिटे सुरु ठेवली जात असल्याने सध्या याठिकाणी वाहतूक कोंडीने वाहनचालकांना त्रस्त केले आहे.आता जुन्या पूलाच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्यात आले आहे. या पूलावरून किती वजनाची वाहने जाऊ शकतात याची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी रविवारपासून चार दिवस पूलावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सध्या एकाच पूलावरून वाहतूक सुरु ठेवण्यात आल्यामुळे रविवारपासून मुंबई अहमदाबाद हायवेवर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. सध्या अवज़ड वाहने मनोर आणि चिंचोटी नाक्यावरून वळवण्यात आली आहेत. असे असले तरी सध्या हायववेर दहा-दहा किलोमीटरच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. दरम्यान, जुन्या पूलाला तडे गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ११ जून २०१४ पासून १५ टनांपेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांना बंदी घातली आहे. त्यानंतर ठाणे आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांनाही बंदीचेआदेश दिलेले आहेत. तरीही त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप नेत्यांनी व स्थानिकांनी केला आहे.