शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत झोपडपट्टीत जास्त कुपोषण

By admin | Updated: September 17, 2014 01:30 IST

अनधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 70 टक्के मुले तर अधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 4क्.67 टक्के मुले कुपोषित असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.

मुंबई  : मुंबईतील अनधिकृत झोपडय़ा हा विषय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतोच. मात्र एका सर्वेक्षणातून पुढे आलेल्या माहितीमुळे हा विषय अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचे दिसून आले आह़े कारण अनधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 70 टक्के मुले तर अधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 4क्.67 टक्के मुले कुपोषित असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.
घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर आणि इंडियन ऑइलनगर या दोन झोपडपट्टय़ांमधील 3क्क् लहान मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ऑब्झव्र्हर रिसर्च फाउंडेशन आणि एम. बी. बारविला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिरांचे आयोजन करून हे सर्वेक्षण करण्यात आले. अनधिकृत झोपडपट्टीमध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त दिसून आले आहे. यामध्ये असेही आढळून आले आहे की, यापैकी 41 टक्के मुले ही त्यांना मिळणा:या मिडडे मिलमधले अर्धे किंवा त्याहून कमी अन्न खातात. आणि इतर अन्न फेकून देतात. कुपोषणाचा परिणाम हा फक्त मुलांच्या शारीरिक वाढीवर होत नाही, तर बौद्धिक वाढीवरदेखील होतो. कुपोषित मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, एकाग्रता कमी असते. 
मुलांची वाढ देखील खुंटलेली दिसल्याचे चित्र या परिसरामध्ये दिसून आले आहे. अधिकृत झोपडपट्टीमध्ये राहणा:या 34 टक्के मुलांची वाढ खुंटलेली दिसून आली तर अनधिकृत झोपडपट्टीमध्ये राहणा:या 51.33 टक्के मुलांची वाढ खुंटलेली असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. काही मुलांना चांगल्या सवयी नसल्याचेही दिसून आले आहे. त्यांची वर्तणूक सामान्य मुलांसारखी नसून त्रसदायक असल्याचेही दिसून आले आहे. ज्या मुलांच्या घरी पाण्याची जोडणी नाही, रोजच्या रोज अन्न मिळत नाही, 
ज्यांच्या घराच्या आजूबाजूचा 
परिसर अस्वच्छ आहे अशा मुलांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे.  (प्रतिनिधी)
 
कुपोषण कमी करण्यासाठी काय करू शकता ?  अंगणवाडीत मिडडे मेल, खाऊ दिला जातो त्यामध्ये बदल करण्यात यावा. मुलांना कशाची गरज आहे, काय खातील याचा विचार केला गेला पाहिजे. मुलांसाठी कोणते अन्न सकस आहे, याविषयी पालकांमध्ये जागृती केली पाहिजे. महापालिका शाळांमधील आरोग्य कार्यक्रमात बदल करण्यात यावेत. स्थलांतरित मुलांर्पयत पोहचण्यासाठी काही उपाययोजना आखल्या पाहिजेत. झोपडपट्टीतील आरोग्याविषयी पुन्हा एकदा विचार करून आरोग्याची आखणी केली पाहिजे.