शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

बिल्डरांवर दाखल होणार एमआरटीपी

By admin | Updated: January 5, 2016 03:03 IST

शहरातील अनेक बिल्डरांनी इमारतींमध्ये वाढीव बांधकाम केले आहे. त्यापैकी ९० टक्के इमारतींना पूर्णत्वाचा दाखला घेतलेला नाही.

उल्हासनगर : शहरातील अनेक बिल्डरांनी इमारतींमध्ये वाढीव बांधकाम केले आहे. त्यापैकी ९० टक्के इमारतींना पूर्णत्वाचा दाखला घेतलेला नाही. त्यामुळे तीन वर्षांतील इमारतींची चौकशी करून नियमबाह्य काम केलेल्या बिल्डरांवर एमआरटीपीअन्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी नगररचना विभागाला दिले आहेत.उल्हासनगरात बांधकाम नियम पायदळी तुडवून सर्रासपणे बहुमजली इमारती बांधल्या जात आहेत. ९० टक्के इमारतींकडे बांधकाम पूर्णत्वासह जोता प्रमाणपत्र नाही. त्यामुळे कायदेशीर अडचणींमुळे इमारतींच्या सोसायट्या स्थापन करता येत नसल्याने, हजारो प्लॉटधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. बिल्डर आणि राजकीय नेत्यांच्या दबंगगिरीमुळे पालिका प्रशासन घाबरत आहे. आयुक्त मनोहर हिरे यांनी तीन वर्षांत उभ्या राहिलेल्या इमारतींना नोटिसा पाठवून पूर्णत्वाचा दाखला का घेतला नाही, याचा जाब विचारला आहे.पालिका प्रभाग समितीनिहाय इमारतींची चौकशी होणार आहे. मंजूर नकाशानुसार इमारतीचे बांधकाम झाले नसल्यास, बिल्डरांसह वास्तुविशारदावर एमएमआरटीअंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत, तसेच अशा बिल्डरांसह वास्तुविशारद, अभियंत्यांना काळ्या यादीत टाकण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. २०१३ पासूनच्या इमारतीची यादी तयार करून त्यांची चौकशी एका आठवड्यात होणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.