शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीच्या बंदरातील कामगारांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:28 IST

जेएनपीटीच्या चौथ्या बंदरात ठेकेदार कंपनीत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना मिळणाºया असुविधा आणि कंपनीच्या व्यवस्थापनाकडून सुरू असलेल्या मनमानी कारभाराविरोधात कामगारांंमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

उरण : जेएनपीटीच्या चौथ्या बंदरात ठेकेदार कंपनीत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना मिळणाºया असुविधा आणि कंपनीच्या व्यवस्थापनाकडून सुरू असलेल्या मनमानी कारभाराविरोधात कामगारांंमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यातच काही कामगारांना तडकाफडकी कामावरून कमी करण्याच्या कारवाईमुळे कामगारांमध्ये असंतोषाचा आणखी भडका उडाला आहे. कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात न्हावा शेवा पोर्ट अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखाली २७० कामगारांनी मागील दहा दिवसांपासून संप सुरू केला आहे. मात्र, दहा दिवसांत कामगारांच्या संपाची कंपनीच्या व्यवस्थापनाने या कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी मुजोर कंपनीविरोधात चक्का जाम आंदोलन सुरू करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.जेएनपीटीचे चौथे बंदर अर्थात भारत मुंबई कंटेनर टर्मिनलमध्ये अनेक खासगी कंपन्या ठेकेदारी पद्धतीवर काम करीत आहेत, यामध्ये बिपिन मरीन सर्व्हिसेस, लकी मरीन सर्व्हिसेस, कॅस्बी लॉजिस्टिक कंपनी आदी कंपन्यांंचा समावेश आहे. या खासगी ठेकेदार कंपन्यांंमध्ये चेकर, ड्रायव्हर, आॅपरेटर म्हणून सुमारे २७० कामगार कंत्राटी पद्धतीवर काम करीत आहेत. मात्र, काम करणाºया कामगारांंना आरोग्य, सेफ्टी आदी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात टाळाटाळ केली जात आहे. कामगारांना कायद्याप्रमाणे वेतन व इतर कामगार भत्ते दिले जात नाहीत. कामगारांना प्रत्यक्षात महिन्याचा पगार हाती न देता कमी पगार देऊन जास्त रकमेच्या वेतनावर सही घेऊन खोट्या वेतनपावतीवर सही घेऊन खोटी कागदपत्रे कंपनीकडे सादर केली जात असल्याचा गंभीर आरोप कामगारांकडून केला जात आहे.मागील दहा दिवसांपासून सुरू केलेल्या संपाला सेनेचे आमदार मनोहर भोईर,जेएनपीटी ट्रस्टी महेश बालदी, उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, भूषण पाटील, संतोष पवार आणि इतर विविध कामगार संघटनांंनी जाहीरपणे पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :JNPTजेएनपीटी