शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उरणच्या शासकीय कार्यालयात सापांचा वावर, कार्यालयं इतरत्र हलविण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 03:23 IST

उरण तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील इमारतीमधील वाढत्या सापांच्या वावरामुळे शहरातील कार्यालय इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भीतीग्रस्त कर्मचा-यांच्या लेखी पत्राद्वारे केलेल्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

उरण : उरण तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील इमारतीमधील वाढत्या सापांच्या वावरामुळे शहरातील कार्यालय इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भीतीग्रस्त कर्मचा-यांच्या लेखी पत्राद्वारे केलेल्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.विविध शासकीय कार्यालयांचे कामकाज चालणा-या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्या इमारतीमध्ये सध्या सापांचा संचार वाढत आहे. सापांच्या कार्यालयातील वाढत्या वावरामुळे कर्मचा-यांमध्ये भीतीचे वातावरण असून भीतीमुळे गर्भगळीत झालेले अनेक कर्मचारी तकलादू कारणे देवून कार्यालयाकडे फिरकेनासे झाले आहेत. यामुळे मात्र संबंधित शासकीय कार्यालयात काम असणा-या नागरिकांना कामासाठी वारंवार पायपीट करण्याची पाळी येवून ठेपली आहे. यामुळे त्यांचा वेळही जात आहे.उरण शहरात रेवस-करंजा प्रकल्प उभारण्याच्या कामकाजासाठी दोन इमारती उभारण्यात आल्या होत्या. हा प्रकल्प जरी मार्गी लागला नसला तरी या ३० वर्षे जुन्या इमारती सध्या विविध शासकीय विभागाच्या कार्यालयासाठी देण्यात आल्या आहेत. तलाठी कार्यालये, वन विभाग, तालुका कृषी विभाग, मत्स्य विभाग आदि शासकीय विभागाचे कामकाज या इमारतीतून चालते. याआधीच या दोन्ही इमारती जीर्ण आणि धोकादायक बनल्या आहेत. तरीही धोकादायक इमारतीमधील कार्यालयामधूनच कर्मचारी जीव मुठीत काम करीत आहेत. त्यातच इमारतीच्या सभोवार असलेली झाडेझुडपे आणि पावसाचे साचलेल्या पाण्यामुळे परिसरात साप आणि सरपटणा-या प्राण्यांचा वावर वाढला आहेत.अशा या सापांनी आता इमारतीतील शासकीय कार्यालयातच बस्तान मांडले आहे. फाईली आणि दप्तराखाली, कानाकोप-यात कर्मचा-यांना साप आढळून येऊ लागले आहे. कार्यालयात सापच साप दिसू लागल्याने भीतीने गर्भगळीत झालेले कर्मचारीही आता भयभीत झाले आहेत. सापांच्या वावरांमुळे भीतीने ग्रासलेले कर्मचारी आणि विविध बहाणे करून इमारतीतील कार्यालयाबाहेर वेळ काढणे पसंत करू लागले आहेत.या दोन्ही इमारती सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित आहेत.या दोन्ही इमारतींच्या स्लॅबला गळती लागलेली आहे. छताला प्लास्टिक लावून कर्मचारी काम करीत आहेत. छतातून टपकणा-या पाण्यापासून महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी कर्मचा-यांना ब-याचदा कसरत करावी लागते. दोन्ही इमारतींचे तळमजले तर बंदच ठेवण्यात आले आहेत. येथे सापांची घरे आढळल्याने कर्मचारी भयभीत झाले आहेत.>तळमजल्यावर सापांची घरेसार्वजनिक बांधकाम खात्याच्या या दोन्ही इमारतींच्या बंद तळमजल्यात सापांनी घरे केली असल्याचे कर्मचा-यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या इमारतींमधून शासकीय कार्यालये इतरत्र हलविण्याची मागणी शासकीय कर्मचा-यांकडून वरिष्ठांकडे करण्यात आली होती.कर्मचा-यांच्या मागणीनंतर आणि येथील परिस्थिती पाहून काही कार्यालये इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्याची महिती अधिकृत सूत्रांनी दिली. या निर्णयामुळे कर्मचा-यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.