शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2016 02:31 IST

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आपल्या महत्त्वाच्या २८ मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने बुधवारी पुकारलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनात रायगड

अलिबाग : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आपल्या महत्त्वाच्या २८ मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने बुधवारी पुकारलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनात रायगड जिल्ह्यातील सर्व म्हणजे ८५० कर्मचारी सहभागी झाले होते. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये ३०० कर्मचारी सहभागी झाले होते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.रायगड जिल्ह्यातील सर्व म्हणजे १५ तहसील कार्यालयांमध्येही काम बंद आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये अव्वल कारकून, वाहनचालक, लिपिक, टंकलेखक, कोतवाल, शिपाई अशा सर्व संवर्गांतील सर्व कर्मचारी सक्रिय सहभागी झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र हे काम बंद आंदोलन १०० टक्के यशस्वी झाले असल्याचे सावंत यांनी सांगितले.अव्वल कारकून, वाहनचालक, लिपिक, टंकलेखक, कोतवाल, शिपाई अशा सर्व संवर्गांतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ततेसाठी अगदी मुख्यमंत्री स्तरावर बैठका होऊन निर्णय झाले, परंतु त्यापुढील कार्यवाही मात्र झाली नाही. शासनाने आपल्या मागण्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी करावी, याकरिता संघटनेच्या माध्यमातून गेल्या १० मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यावर कारवाई झाली नसल्याने गेल्या २२ मार्च रोजी काळ््या फिती लावून काम करून शासनाच्या निषेधाचे आंदोलन करण्यात आले. त्यावरही शासनाकडून कोणताही निर्णय घेतला नाही, म्हणून गेल्या १ एप्रिला दुपारच्या भोजनाच्या सुटीत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात आली. त्याचीही दखल शासनाने घेतली नाही म्हणून संघटनेच्या राज्यस्तरीय निर्णयानुसार बुधवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. बुधवारच्या या धरणे आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही तर अखेर येत्या १ मे या महाराष्ट्र दिनी मुंबईत मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन तर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर साखळी उपोषण करण्याचा निर्णय संघटनेने घेतला असल्याची माहिती सावंत यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)