शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई - गोवा महामार्गावर शेकापचे आंदोलन

By admin | Updated: July 12, 2016 02:50 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर जून २३ तारखेपासून जुलैपर्यंत पडलेल्या २० दिवसांच्या पावसात राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडून रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.

पेण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर जून २३ तारखेपासून जुलैपर्यंत पडलेल्या २० दिवसांच्या पावसात राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडून रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. कोकणची जीवनवाहिनी असलेला महामार्गावरील खड्डे व रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, कोकणातील चाकरमान्यांचा व स्थानिकांचा प्रवास सुखरूप व्हावा, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने रस्त्याच्या कडेला मानवी साखळी उभारून महामार्गावर तरणखोल ते वडखळपर्यंत सोमवारी सकाळी ८.३० ते १२ वाजेपर्यंत आ. धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली मानवी साखळी आंदोलन छेडीत शासनाला महामार्गाच्या दुरवस्थेची जाणीव करून दिली.पेणमधील जिते-तरणखोल-हमरापूर फाटा ते पेण रेल्वे स्थानक, वाशीनाका, वडखळ या १५ किमीच्या टप्प्यात भरपावसात शेकाप कार्यकर्त्यांनी ३,५०० ते ४,००० च्या आसपास मानवी साखळी उभारून महामार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना छत्र्या, केळी, पाण्याच्या बॉटल व महामार्गाच्या अवस्थेबाबतचा तपशील असलेल्या निवेदनाच्या प्रती प्रत्येक वाहनचालकांना दिल्या. कार्यकर्त्यांचा हा उत्साह पेणच्या टप्प्यात जागोजागी दिसून येत होता. अभिनव पद्धतीच्या या आंदोलनाने वाहनचालकही भारावून गेले. कुठेही वाहतूक व्यवस्थेला जराही अडसर न करता केलेले हे आंदोलन पहिल्यांदाच महामार्गावर झाले आहे. शेकापचे पंचायत समिती सभापती मारु ती कदम, शेकाप नेत्या अ‍ॅड. नीलिमा पाटील, महिला आघाडीच्या शीतल ठाकूर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रमोद पाटील, यशवंत म्हात्रे, जयप्रकाश ठाकूर, उपसभापती प्रफुल्ल म्हात्रे, रोडे सरपंच स्वप्निल पाटील, संदेश ठाकूर, लाल ब्रिगेड, पुरोगामी आघाडी, शेकाप माजी सभापती संजय भोईर, सुनील गायकर यांच्यासह सरपंच, विविध कमिट्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सहभाग होता. या आंदोलनाची रूपरेषा शेकापच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी तयार केली होती. पावसाळी अधिवेशनात या प्रश्नावर शेकाप सभागृहात आक्रमक होईल, असे धैर्यशील पाटील यांनी याप्रसंगी सांगितले, तर मोर्चाच्या तयारीची सर्वस्वी जबाबदारी महादेव दिवेकर व संजय डंगर यांनी यशस्वीपणे सांभाळली. (वार्ताहर)