शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये तलाठ्यांचे आंदोलन, काळी फित लावून होणार कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 04:52 IST

जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील तलाठी योगेश रमेश पाटील कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी १२ दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात लेखणी बंद आंदोलन चालू आहे.

पनवेल : जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील तलाठी योगेश रमेश पाटील कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी १२ दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात लेखणी बंद आंदोलन चालू आहे. अद्यापही आरोपीना अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे त्याचा निषेध म्हणून शनिवारी निवासी नायब तहसीलदार बी. टी. गोसावी यांना निवेदन देण्यात आले. तसेच ५ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात काळ्या फिती लावून कामकाज होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी काळी फित लावून कामकाज होईल, असेही पनवेल तालुका तलाठी संघटनेमार्फत दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.तलाठी योगेश पाटील यांना मारहाण झाल्यानंतर निवेदन देऊन झाले, महसूलमंत्री यांच्याशी बोलून झाले, विभागीय आयुक नाशिक यांची भेट घेऊन चर्चा झाली. परंतु अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्याचा निषेध म्हणून ७ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, तरीही मागणी पुर्ण झाली नाही तर ९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. यानंतरही मागणी पुर्ण झाली नाही तर राज्यात संपूर्ण लेखणी बंद आंदोलन मागणी पुर्ण होईपर्यंत चालू ठेवण्याची भूमिका घेण्यात येईल असा निर्णय राज्य संघाचे वतीने घेतला आहे असे निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :panvelपनवेल