ठाणो : घोडबंदर रोड येथील स्वस्तिक रेसिडेन्सी या इमारतीमध्ये राहणा:या चंद्रकात मारू (70) यांनी घरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे सूनेने काढण्यास सांगितल्यानंतर तिचा विनयभंग केल्याची तक्रार तिने कासारवडवली ठाण्यात नोंदविली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरा पकडीने फोडून संगणकाचीही मोडतोड करण्याचा प्रय} केल्याचा जाब विचारला म्हणून सुनेने त्यांना डोक्यात मारून दुखापत केल्याची तक्रार त्यांनीही नोंदविली आहे.
घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे:यामुळे प्रायव्हसी मिळत नसल्याने या महिलेने हा कॅमेरा 15 ऑक्टोबरला सकाळी पकडीने तोडण्यास सुरुवात केली. त्याच वेळी मारू यांनी तिचा विनयभंग केला. तसेच गळा दाबून मारहाणही केली. याप्रकरणी या महिलेने कासारवडवली ठाण्यात तक्रार दाखल केली. मारू यांच्या तक्रारीनुसार सीसीटीव्ही कॅमेरा फोडून हॉलमधील संगणकही फोडण्याचा प्रय} तिने केला. तेव्हा तिला अटकाव केला असता तिने स्टीलच्या पकडीने त्यांना डोक्यात मारले. (प्रतिनिधी)