शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये सर्वाधिक अतिक्रमणे

By admin | Updated: February 3, 2016 02:18 IST

पनवेल परिसरातील सिडको हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आढळून आली आहे. विनापरवाना बांधकाम जास्त असून त्याचा वापर व्यावसायिक कारणाकरिता केला जात आहे.

पनवेल : पनवेल परिसरातील सिडको हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आढळून आली आहे. विनापरवाना बांधकाम जास्त असून त्याचा वापर व्यावसायिक कारणाकरिता केला जात आहे. या व्यतिरिक्त भाडे तत्त्वावर देण्याकरिता चाळीही बांधण्यात आल्या असून शहरात अनधिकृत बांधकामांनी शंभरी गाठली आहे. धाकटा खांदा, नवीन पनवेल, टेंभोडे, गव्हाण, आसुडगाव, भिंगारी, खांदा वसाहत, काळुंद्रे, वडघर या भागात सिडकोची हद्द आहे. येथील एकूण १०५अनधिकृत बांधकामे सिडकोच्या यादीत मंगळवारी जाहीर झाली आहेत. नवीन पनवेल नोडमध्ये सेक्टर १५ व ४ येथील मोकळ्या भूखंडावर अनधिकृत भीमनगर वसविण्यात आले आहे. काळुंद्रे येथे पाच बांधकाम व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे. त्याकरिता सिडकोकडून परवानगी घेतलेली नाही. करंजाडे येथे सहा बेकायदेशीर बांधकाम उभारण्यात आले असून त्यांना नोटिसा बजाविण्यात आलेल्या आहेत. आसुडगाव वडघर येथे बेकायदेशीर चाळी बांधण्यात आलेल्या आहेत. खांदा वसाहतीत अनधिकृत झोपड्यांबरोबर बेकायदा कार्यालये थाटण्यात आलेले आहेत. उड्डाणपुलाच्या खाली भारतीय जनता पक्षाकरिता कार्यालय बांधण्यात आलेले आहे. जे.पी. भगत यांचे मिनी रायगड मार्केट सुध्दा बेकायदा असल्याचे यादीत नमुद करण्यात आलेले आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकरिता शशिकांत डोंगरे यांनी सेक्टर-१३ भूखंड क्र मांक ८ वरती कार्यालयाकरिता बांधकाम करून अतिक्र मण केले आहे. नवीन पनवेल सेक्टर२ मध्ये भूखंड क्र मांक ३६वर अष्टविनायक वाहन चालक मालक संघटनेने अतिक्र मण केले आहे. > नोटिसीमुळे खळबळनवी मुंबई : सिडकोने बेकायदा बांधकामांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात तब्बल ५६९ अतिक्रमणांचा समावेश आहे. या सर्व बांधकामांना सिडकोने नोटिसा बजावल्या असून त्यावर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे बांधकामधारकांत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोने जानेवारी २0१३ नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. परंतु प्रकल्पग्रस्तांच्या तीव्र विरोधामुळे मध्यंतरीच्या काळात ही मोहीम काहीशी थंडावली होती.