शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

रेडीमेड गुढ्यांना मिळतेय अधिक पसंती

By admin | Updated: April 4, 2016 02:14 IST

मेट्रो सिटीतील धावपळीचे जीवन, आधुनिक जीवनशैलीमुळे गुढीसाठी मोठी काठी, नवीन कपडे, ताम्रकलश यांसारख्या गोष्टी उपलब्ध होतीलच असे नाही

प्राची सोनवणे,  नवी मुंबईमेट्रो सिटीतील धावपळीचे जीवन, आधुनिक जीवनशैलीमुळे गुढीसाठी मोठी काठी, नवीन कपडे, ताम्रकलश यांसारख्या गोष्टी उपलब्ध होतीलच असे नाही. यामुळे रेडीमेड गुढ्या हा पर्याय बाजारात उपलब्ध असून याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शहरातील बचत गटांच्या महिलांनी गेल्या काही महिन्यांपासून या लहान गुढ्या तयार करण्यास सुरुवात केली आहे. या गुढ्यांना मागणी असल्याचे पाहायला मिळाले. या गुढ्यांमध्ये मिनी आण जम्बो असे दोन प्रकार असल्यामुळे कोणी हौसेखातर तर कोणी पूजनासाठी या गुढ्यांची खरेदी करीत होते. यात लहान आकरातील गुढी ३० ते १०० रु पयांपर्यंत तसेच मोठ्या आकारातील गुढी ७० रुपयांपासून ते ३५० रु पयांपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध आहेत. कापड, लाकूड आणि मेण यांचा वापर करून तयार केलेल्या छोट्या आकारातील रेडीमेड गुढ्या वाशीतील एपीएमसी बाजारपेठेमध्ये तसेच शहरातील दुकानांमध्ये आणि मॉल्समध्ये विक्र ीसाठी उपलब्ध आहेत. प्लास्टिकच्या वाटीमध्ये मेण टाकून छोठ्या काठीवर सोवळ्याचे वस्त्र, साखरगाठींचा कृत्रिम कलात्मक हार, तांब्या, कडुनिंबाची कृत्रिम पाने आदींचा वापर करून तयार केलेली छोटीशी गुढी लक्ष वेधून घेत आहे. काही ठिकाणी लाकूड, प्लास्टर आॅफ पॅरिसचा पृष्ठभाग वापरून त्यावर केलेल्या रेडीमेड गुढ्या विक्र ीसाठी उपलब्ध आहेत. सध्या फ्लॅट संस्कृतीमध्ये गुढीसाठी जागा उपलब्ध नसते. त्यामुळे घरातील देव्हाऱ्यामध्ये, मोटारीत तसेच कार्यालयातही ठेवता येतील अशा या छोट्या गुढ्यांना चांगली पसंती मिळते आहे.