शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

३० हजारांहून अधिक भटके कुत्रे

By admin | Updated: February 7, 2016 02:53 IST

रात्री-अपरात्री घरी परतणाऱ्या नागरिकांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले होत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. संपूर्ण शहरात सुमारे तीन हजार कुत्रे आहेत.

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई

रात्री-अपरात्री घरी परतणाऱ्या नागरिकांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले होत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. संपूर्ण शहरात सुमारे तीन हजार कुत्रे आहेत. निर्बीजीकरणावर दरवर्षी दीड ते दोन कोटी रुपये खर्च होत असले तरी कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे समोर येत आहे. भरदिवसा लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी तर प्रत्येक विभागातल्या रस्त्यावर मोठ्या संख्येने भटके कुत्रे फिरत असतात. हे कुत्रे रात्रीच्या वेळी दुचाकीचालकांच्या मागे लागत असल्याने अपघाताच्या घटनाही शहरात घडल्या असून, यात अनेक जण जखमी झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भटक्या श्वानांविषयी चीड निर्माण झालेली आहे.महापालिकेतर्फे २०१२ मध्ये झालेल्या श्वान गणनेनुसार शहरात २९ हजार ८६४ श्वान आहेत. मात्र मागील तीन वर्षांत यात मोठी वाढ झाली आहे. भटके कुत्रे मारण्यावर बंदी असल्याने महापालिकेकडून निर्बीजीकरण करण्यात येते असून, इन डिफेन्स अ‍ॅनिमल या संस्थेमार्फत पालिका हे काम हाताळत आहे. संस्थेला प्रतिश्वान ४०० रुपये दिले जातात. त्यानुसार दरवर्षी महापालिका क्षेत्रातून सुमारे साडेचार ते पाच हजार श्वान पकडले जात असून त्यांच्यावर दीड ते दोन कोटी रुपयांचा खर्च होत आहे. अशाप्रकारे या संस्थेने मागील ८ वर्षांत ३४ हजार ५०० श्वानांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केलेली आहे. एकूण ३४ हजार श्वानांवर सुमारे १६ कोटी रुपयांचा खर्च पालिकेने संस्थेच्या माध्यमातूून केलेला आहे.महापालिकेच्या आठ विभागांतून प्रतिवर्षी ३०० ते ५०० श्वान पकडले जात आहेत. यानंतर त्यांचे निर्बीजीकरण करून पुन्हा त्याच परिसरात सोडले जाते. मात्र वर्षानुवर्षे होणाऱ्या निर्बीजीकरणानंतरही विभागनिहाय वाढती श्वानांची संख्या पाहून पालिकेच्या मोहिमेबाबत नागरिकांना प्रश्नचिन्ह पडत आहे. दिवसा सहसा न दिसणारे कुत्रे रात्रीच्या वेळी मात्र समूहाने रस्त्यावर फिरत असतात. अनेकदा त्यांची संख्या व आक्रमकता पाहून नागरिकांनाही आपला मार्ग बदलावा लागतो. त्यामुळे कुत्रे पकडण्याची कारवाई रात्रीदेखील करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.