शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मोरबेत सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:33 IST

नागरिकांना दिलासा : पाणीकपात टळली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबईनंतर राज्यात स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई ही राज्यातील दुसरी महापालिका ठरली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात सध्या पुढील चार महिने म्हणजेच सप्टेंबर महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याविषयीची चिंता मिटली आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले होते. गेल्या वर्षी मागील ९८ वर्षांनंतर प्रथमच धरण परिसरात जवळजवळ पाच हजार मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हे पाणी पुढील चार महिने म्हणजेच सप्टेंबरपर्यंत पुरेल, असा विश्वास महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.धरणाची पाणी साठविण्याची क्षमता १९०.८९ एवढी असून धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण क्षमतेने भरते. सध्या धरणातील पाण्याची पातळी ७४ मीटर इतकी असल्याची माहिती मोरबे धरणाचे कार्यकारी अभियंता अजय संखे यांनी ‘लोकमत’ला दिली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी तिवरे धरणाच्या दुर्घटनेनंतर मोरबे धरणाची पाटबंधारे विभागामार्फत पाहणी करण्यात आली होती. तेव्हा धरण मजबूत असल्याचे व नवीन अभियंत्यांना अभ्यास करण्यासाठी हे धरण दाखविले जावे, अशी शिफारस करण्यात आली होती.नवी मुंबई शहर हे मोरबे धरणामुळे जलसंपन्न झाले आहे. धरणातून शहराला चोवीस तास अखंडित पाणीपुरवठा केला जातो.