शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी मोर्बे धरणाची चाचपणी

By admin | Updated: April 30, 2016 02:31 IST

प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेचा अहवाल जवळपास तयार झाला आहे.

प्रशांत शेडगे,

पनवेल-प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेचा अहवाल जवळपास तयार झाला आहे. लोकसंख्या, त्यानुसार अभ्यास समितीने वाढत्या लोकसंख्येनुसार आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा आढावा घेतला आहे. त्यानुसार प्रस्तावित पनवेल महापालिकेसाठी प्रतिदिनी सुमारे ६५0 एमएलडी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. त्याकरिता बाळगंगा हेटवणे धरणाबरोबरच पनवेल तालुक्यातील मोर्बे धरणाची चाचपणी केली जात आहे. यासंदर्भात महसूल आणि पाटबंधारे विभागाकडून माहिती मागविण्यात आल्याचे समजते. नवीन महापालिकेच्या स्थापनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती गठीत केली आहे. या समितीने मागील काही महिन्यात भौगोलिक स्थिती, कृषिक अकृषिक क्षेत्र,नगरपालिका, ग्रामपंचायतीचा महसूल, भौगोलिक तसेच प्रशासकीय व आवश्यक मनुष्यबळ आदी गोष्टींचा आढावा घेवून अंतिम अहवाल तयार केला आहे. महापालिका झाल्यानंतर नेमके काय बदल होतील, त्याचबरोबर कोणत्या कोणत्या पायाभूत सुविधांची आवश्यकता भासणार आहे याबाबत परिपूर्ण माहितीचा या अहवालात समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रस्तावित महापालिकेला भविष्यात भविष्यात नेमके किती पाणी लागेल याबाबतीचा आढावाही घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रस्तावित पनवेल महापालिकेला पाण्याची मोठ्याप्रमाणात गरज लागणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही तहान भागविण्याकरिता कोणते कोणते पर्याय आहेत याचीही चाचपणी करण्यात आलेली आहे. आजच्या घडीला पनवेल नगरपालिका हद्द आणि नवीन पनवेल, कळंबोली या वसाहतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो. नवी मुंबई महापालिका आणि सिडको प्राधिकरणाकडून पाणी विकत घेवून रहिवाशांना पुरवते. कामोठे वसाहतीला नवी मुंबई महानगरपालिकेकडून तर खारघरला हेटवणे धरणातून पाणी दिले जाते. कित्येक गावे बोअरवेलवर अवलंबून आहेत. त्यामुळे जर महानगरपालिका झाली तर पाण्याचे नेमके काय नियोजन करावे लागेल याचा अभ्यासही समितीने केला आहे. प्रस्तावित महानगरपालिकेला एमजेपी,एमआयडीसी हेटवणे धरणातून तर पाणी घ्यावे लागणार आहेच, त्याचबरोबर मोठी तहान शमविण्याकरिता बाळगंगा आणि कोंढाणे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी घ्यावे लागणार आहे. या धरणातून जवळपास ६00 एमएलडी पाणी उपलब्ध होवू शकते, असा समितीचा निष्कर्ष आहे.