शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मुरु ड-अलिबाग रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: March 28, 2017 05:24 IST

मुरु ड ते अलिबाग या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून खड्ड्यातून रोज प्रवास करावा लागल्याने

नांदगाव/ मुरु ड : मुरु ड ते अलिबाग या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून खड्ड्यातून रोज प्रवास करावा लागल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील इतर काही रस्ते तयार झाले परंतु या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेली एसटी या मार्गावर धावत असली तरी यामुळे एसटीचे नुकसान होत आहे. येथील काही रस्त्याला फक्त कार्पेट केले तरी हे रस्ते सुस्थितीत होऊ शकतात, परंतु सार्वजनिक बांधकाम खाते यावर कोणतीही उपाययोजना करण्यास तयार नाही. कोणताही राजकीय नेता या रस्त्यांकडे गांभीर्यपूर्वक पाहत नाही, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांचे देखील या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्याला आता कोणीही वाली राहिला नाही, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दोन ते तीन महिन्यांवर पावसाळा आला असून सुद्धा या रस्त्याबाबत बांधकाम खात्याची भूमिका काय हे अद्याप स्पष्ट न झाल्याने हे रस्ते होणार तरी कधी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.मुरु ड ते अलिबाग हे अंतर ४८ किलोमीटर असून एसटीने प्रवास केल्यास अलिबाग येथे पोहचण्यासाठी अडीच तास लागतात,तर खासगी गाडीने दोन तास लागतात. वावे मार्गे प्रवास करावा लागत असल्याने व येथे खड्डे असल्याने या ठिकाणी पोहचण्यास खूप वेळ लागत आहे. रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे असे फक्त ऐकिवात येते, परंतु आलेला निधी रस्त्यावर खर्च होताना दिसत नसल्याने हे रस्ते होणार तरी कधी हा प्रश्न येथे नागरिकांकडून विचारला जात आहे. मुरु ड ते साळाव हा रस्ता १९९२ साली तयार करण्यात आला. हे अंतर ३२ किलोमीटर एवढे आहे, परंतु आजतागायत या रस्त्याने कधीच कार्पेट न अंथरल्याने आता हे सुद्धा रस्ते खराब होत आहेत.