शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तीन गुंडांवर मोक्का

By admin | Updated: October 22, 2015 00:29 IST

छोटा राजन टोळीतील गुंडांनी आॅगस्टमध्ये शहरातील नामांकित बिल्डरकडे २६ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तीन आरोपींना अटक केली

नवी मुंबई : छोटा राजन टोळीतील गुंडांनी आॅगस्टमध्ये शहरातील नामांकित बिल्डरकडे २६ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. शहरातील एक बिल्डरला १७ आॅगस्टला छोटा राजनच्या हस्तकांनी खंडणीसाठी धमकी दिली. बिल्डरच्या कार्यालयात जाऊन २६ कोटी रुपयांची मागणी केली होती. चेंबूरमध्ये मीटिंगसाठी आला नाही तर जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याविषयी सदर बिल्डरने नवी मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. पोलीस आयुक्त प्रभात रंजन, अतिरिक्त आयुक्त विजय चव्हाण व गुन्हे शाखेचे उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणी राजन टोळीतील सुरेश शामराव शिंदे ऊर्फ लक्ष्मण, अशोक हितेंद्र निकम ऊर्फ दाद्या व समित विजय म्हात्रे या तिघांना ७ आॅक्टोबरला अटक केली आहे. त्यांच्याकडून ३६३ ग्रॅम वजनाचे दागिने, ५ मोबाइल, ५३ हजार रोख व कार असा १८ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपी छोटा राजन टोळीशी संबंधित असून, त्याच्या सांगण्यावरून धमकी दिली असल्यामुळे चार जणांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. पुढील तपास परिमंडळ दोनचे उपायुक्त विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (प्रतिनिधी)कारवाईचा धडाकागुन्हे शाखेचे उपायुक्तत सुरेश मेंगडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यापूर्वी रवी पुजारी टोळीतील गुंडांवर, सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई केली होती. शहरात पहिल्यांदाच एवढ्या कमी काळात मोक्काच्या तीन कारवाया झाल्या आहेत.