शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

क्लासच्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 01:15 IST

खासगी शिकवणीच्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घणसोली येथे घडली आहे.

नवी मुंबई : खासगी शिकवणीच्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घणसोली येथे घडली आहे. या प्रकाराची माहिती पीडित मुलीने घरी दिल्यानंतर पालकांच्या तक्रारीनुसार कोपरखैरणेपोलिसांनी सदर शिक्षकाला अटक केली आहे. त्याने इतरही अनेक विद्यार्थिनींसोबत लगड करण्याचा प्रयत्न केल्याचा पालकांचा आरोप आहे.तुषार नवले, असे पोलिसांनी अटक केलेल्या खासगी क्लासच्या शिक्षकाचे नाव आहे. त्याचा घणसोली सेक्टर-५ येथे मुक्ता खासगी शिकवणीचा क्लास आहे. त्या ठिकाणी परिसरातीलच एक दहावीची विद्यार्थिनी शिकवणीसाठी येत होती. त्याने सदर मुलीसोबत यापूर्वीही अनेकदा लगड करण्याचा प्रयत्न केला होता.अखेर शुक्रवारी संध्याकाळी क्लासमध्ये गेली असता, नवले याने ती एकटी असल्याची संधी साधून तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. यानंतर ती क्लासला गेलेली नव्हती. त्यामुळे सोमवारी नवले याने सदर विद्यार्थिनीला फोन करून, ‘क्लासला कधी येणार?’ असे विचारले असता, ती रडू लागली.याबाबत घरच्यांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानुसार तिच्या नातेवाइकांनी नवले याच्याविरोधात कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार केलीअसता, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.दरम्यान, त्याने इतरही काही विद्यार्थिनींसोबतही यापूर्वीही लगड करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पालकांचे म्हणने आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस अधिक तपास करत आहेत.