ठाणे : शहरामध्ये दाट लोकवस्तीच्या ठिकाणी आधुनिक शौचालये उभारण्याच्या कामाला गती प्राप्त झाली असून शुक्रवारी त्याबाबतच्या सामंजस्य करारावर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक राजन सॅम्युअल आणि अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी स्वाक्षरी केली.महापालिका आयुक्तांच्या पुढाकाराने १५ दिवसांपूर्वी याबाबतची पहिली बैठक झाली होती. त्यानंतर, या प्रकरणी तत्काळ कार्यवाही करून या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. ती दाट लोकवस्तीमध्ये उभारण्यात येणार असून त्यामध्ये चेजिंग रूम, वॉश रूम या सुविधा देण्यात येणार आहेत. त्यात महिला, पुरुष, लहान मुले तसेच अपंगांसाठी स्वतंत्र कक्ष असणार आहेत. सुरुवातीला विविध १० ठिकाणी ती उभी करण्यात येणार आहे.या वेळी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, उपआयुक्त (घनकचरा) संजय हेरवाडे, उपआयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रतन अवसरमोल, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया संस्थेचे संचालक संजय दासवानी, सहा. संचालक (विशेष प्रकल्प) विजय झॅलेक्सो, विल्फ्रेड फर्नांडिस आदी उपस्थित होते.
आधुनिक शौचालय बांधणीचा करार
By admin | Updated: October 12, 2015 04:30 IST