शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

अत्याधुनिक रूग्णवाहिका धूळ खात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:37 IST

पालिकेचा ७० लाख खर्च वाया : पाच वर्षांमध्ये दोन्ही वाहनांचा वापर नाही; बसमध्ये रूपांतर करण्याचा विचार

नामदेव मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने २०१४ मध्ये दोन अत्याधुनिक फॅक व्हॅन विकत घेतल्या. ७० लाख रुपये खर्च करून विकत घेतलेल्या या रुग्णवाहिकांचे सप्टेंबर २०१४ मध्ये लोकार्पण करण्यात आले. मात्र पाच वर्षांमध्ये एकदाही या वाहनांचा उपयोग झाला नसून सर्व खर्च व्यर्थ गेला आहे.नवी मुंबई महानगरपालिका धाडशी व महत्त्वाकांक्षी उपक्रम व प्रकल्प राबविण्यासाठी प्रसिद्ध आहे. स्वत:च्या मालकीचे धरण विकत घेण्यापासून ते अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र उभारण्यापर्यंत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प येथे उभारण्यात आले आहेत. यामधील काही प्रकल्प फसले असून त्यावर करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला. या फसलेल्या प्रयोगांमध्ये अत्याधुनिक फॅक व्हॅनचा (फ्लोटिंग अ‍ॅडव्हान्स कॅज्युलिटी कॉम्प्लेक्स) समावेश आहे. तब्बल ७० लाख रुपये खर्च करून दोन रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या. सप्टेंबर २०१४ मध्ये त्याचे प्रत्यक्षात लोकार्पणही करण्यात आले. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये सायन - पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूरसह पामबीच रोडवर वारंवार अपघात होत असतात. रेल्वे रूळ ओलांडताना अपघात होऊन तसेच रस्ते व रेल्वे अपघातांमध्ये प्रत्येक वर्षी जवळपास ५०० व्यक्तींना जीव गमवावा लागतो. तर दीड ते दोन हजार व्यक्ती गंभीर जखमी होतात. अपघात झाल्यानंतर जखमींवर तत्काळ उपचार करता यावेत यासाठी या अत्याधुनिक रुग्णवाहिका विकत घेण्यात आल्या होत्या. या रुग्णवाहिकेमध्ये तज्ज्ञ डॉक्टर व इतर कुशल कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात येणार होते. रुग्णवाहिकेमध्ये छोटे शस्त्रक्रियागृहही तयार केले होते. परंतु प्रत्यक्षात एकदाही त्यांचा वापर करण्यात आलेला नाही.अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे लोकार्पण झाल्यानंतर काही दिवस त्या महापालिका मुख्यालयामध्ये उभ्या करण्यात आल्या होत्या. नागरिकांकडून टीका होऊ लागल्यानंतर त्या वाशी सेक्टर ६ मधील बस स्थानकाच्या आवारामध्ये उभ्या करण्यात आल्या. तेथून एनएमएमटीच्या तुर्भे डेपोमध्ये व कालांतराने पुन्हा महापालिका मुख्यालयाच्या आवारात उभ्या करण्यात आल्या. रुग्णवाहिकांचा वापर करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्याचा प्रयत्नही झाला. प्रत्येक वर्षी दोन्ही रुग्णवाहिका चालविण्यासाठी आणि त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ठेकेदारास ३ कोटी १९ लाख रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये सादरही करण्यात आला होता. परंतु त्यास विरोध झाला. महापालिकेने स्वत: या रुग्णवाहिका चालविण्याची मागणी करण्यात आली. परंतु मनुष्यबळ कमी असल्यामुळे प्रत्यक्षात त्या पूर्ण करणे शक्य झाले नाही. २०१७ मध्ये रुग्णवाहिकेचे एनएमएमटी बसेसमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न झाला; परंतु तोही बारगळला. रुग्णवाहिकेचा विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा म्हणून उपयोग करण्याचा प्रयत्नही प्रत्यक्षात साकारू शकला नाही.अत्याधुनिक ‘फॅक व्हॅन’ रुग्णवाहिका भंगारातच्सप्टेंबर २०१४ मध्ये ७० लाख रुपये खर्च करून विकत घेतलेल्या अत्याधुनिक फॅक व्हॅन महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या. मात्र पाच वर्षांमध्ये एकदाही त्यांचा वापर झालेला नाही.च्एका जागेवर उभ्या असल्यामुळे त्यांचा रंग उडाला आहे. टायरची झीज झाली आहे. अशीच स्थिती राहिली तर न वापरताच त्या भंगारात देण्याची वेळ येईल, असे मत व्यक्त केले जात आहे.पुन्हा एनएमएमटीकडे सोपविणारच्फॅक व्हॅनचा नक्की काय वापर केला जाणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. महापालिका मुख्यालयाच्या परिसरात उभी केलेली वाहने पंधरा दिवसांपूर्वी दुसरीकडे हलविण्यात आली आहेत.च्आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता सद्य:स्थितीमध्ये ती वाहने आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार नसल्याचे सांगितले.च्वाहन विभागाचे उपायुक्त नितीन काळे यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.च्ही वाहने पुन्हा एनएमएमटीकडे सुपुर्द करून त्यांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती महापालिकेमधील सूत्रांनी दिली.अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळवून देण्यासाठी दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या होत्या. पाच वर्षांमध्ये या दोन्ही रुग्णवाहिकांचा काहीही उपयोग झालेला नाही. महापालिकेचे पैसे व्यर्थ गेले आहेत. वापर न झाल्यामुळे वाहनांची झीज सुरू आहे. या वाहनांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.- नामदेव भगत,नगरसेवक, शिवसेना