शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

उरण परिसरात दंगा काबू पथकाकडून मॉकड्रिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 01:29 IST

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नियोजन : अयोध्येतील जमीनमालकीच्या वादावर निकाल अपेक्षित

उरण : येत्या काही दिवसांमध्ये अयोध्येतील जमीनमालकीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उरण पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी सकाळी चारफाटा एसटी स्थानक परिसरात संयुक्त दंगा काबूयोजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.

दंगा काबू योजनेमध्ये मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून जमाव जमल्याबाबतचा विषय घेण्यात आला होता. दंगा काबू योजनेमध्ये सहा. पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे यांच्या निरीक्षणाखाली उरण पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी, ११- सपोनि / पोउपनिरीक्षक व ५० पोलीस कर्मचारी, न्हावाशेवा पोलीस ठाण्यातील एक सपोनि व तीन पोलीस कर्मचारी ओएनजीसी, सिडको फायर ब्रिगेड अधिकारी, कर्मचारी, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, उरणचे डॉक्टर व कर्मचारी, आरसीपी नवी मुंबईचे एक पोलीस उपनिरीक्षक व २३ पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. दंगा काबू योजना शांततेत पार पडली.शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ; बैठकांवर भरच्नवी मुंबई : अयोध्येतील जमीनमालकी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबईत संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. त्याकरिता सर्वधर्मीयांच्या बैठका घेतल्या जात असून, पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.अयोध्या येथील जमिनीच्या निकालाच्या अनुषंगाने देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत समाजकंटकांकडून धार्मिक तेढ निर्माण केली जाई शकते. यामुळे उद्भवणारे संभाव्य वाद टाळण्यासाठी पोलिसांनाही सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.च्शहरात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या जात आहेत. याशिवाय सायबर सेल पोलिसांमार्फत विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. तर शहरातील महत्त्वाचे चौक व आवश्यक ठिकाणांवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई