शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र भवनवरून मनसे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 03:51 IST

वाशीत आरक्षित भूखंडावर मनसेतर्फे कुदळ मारण्यात आली. सिडकोच्या उदासीनतेमुळे १५ वर्षांपासून महाराष्ट्र

नवी मुंबई : महाराष्टÑ भवनसाठी वाशीत आरक्षित भूखंडावर मनसेतर्फे कुदळ मारण्यात आली. सिडकोच्या उदासीनतेमुळे १५ वर्षांपासून महाराष्टÑ भवन उभारण्यात आलेले नाही. याचा निषेध व्यक्त करत महाराष्टÑ दिनाच्या निमित्ताने मनसेने या कामाला सुरुवात केली आहे.सिडकोने वाशी सेक्टर ३० अ येथे महाराष्टÑ भवनसाठी भूखंड आरक्षित ठेवलेला आहे. परंतु गेल्या पंधरा वर्षात या आरक्षित भूखंडावर महाराष्टÑ भवनचे प्रत्यक्षात कसलेही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे हा भूखंड खासगी विकासकाच्या घशात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यास विरोध दर्शवत आरक्षित भूखंडावरच महाराष्टÑ भवन उभे राहावे, अशी मागणी नवी मुंबई मनसेतर्फे लावून धरण्यात आली आहे. परंतु निवेदने देऊनही सिडको प्रशासन दाद देत नसल्याचा संताप व्यक्त करत काही दिवसांपूर्वीच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी महाराष्टÑ दिनी मनसेतर्फे महाराष्टÑ भवनच्या कामाला सुरुवात केली जाईल, असा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी महाराष्टÑ दिनाच्या औचित्यावर मनसे कार्यकर्त्यांनी आरक्षित भूखंडावर कुदळ मारून महाराष्टÑ भवनच्या कामाला सुरुवात केली. याप्रसंगी शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष नीलेश बाणखेले, विनोद पार्टे, डॉ. आरती धुमाळ, गायत्री शिंदे, अनिथा नायडू, विलास घोणे, विनायक पिंगळे, प्रेम जाधव आदी उपस्थित होते.