शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतदारांना लाच देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 04:31 IST

पनवेलचे भाजपाचे आमदार प्रशांत राम ठाकूर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता.

मुंबई : पनवेलचे भाजपाचे आमदार प्रशांत राम ठाकूर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पैशाची पाकिटे घेऊन जाणारी त्यांची प्रचाराची गाडी मध्येच पकडली गेल्याने त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.आमदार ठाकूर यांची निवडणूक रद्द करावी यासाठी शेकापचे पराभूत उमेदवार बाळाराम दत्तात्रय पाटील ऊर्फ बाळूशेठ यांनी निवडणूक याचिका केली होती. त्यात ठाकूर यांनी मतदारांना लाच दिली, असा एक मुद्दा होता. न्या. सुभाष गुप्ते यांनी ही याचिका फेटाळताना म्हटले की, पाटील यांनी केलेले आरोप आणि त्याच्या पुष्ठ्यर्थ सादर केलेले पुरावे यांचा साकल्याने विचार केला तर आमदार ठाकूर यांनी मतदारांना प्रत्यक्षात लाच दिली असा निष्कर्ष काढता येत नाही. पाटील यांचे सर्व म्हणणे खरे मानले तरी ठाकूर यांनी मतदारांना लाच देण्याची तयारी केली होती. परंतु त्यांचा हा प्रयत्न सफल होऊ शकला नाही, असे फार तर म्हणता येईल.पाटील यांच्या आरोपानुसार आमदार ठाकूर यांच्या प्रचारासाठी वापरली जाणारी एक स्कॉर्पिओ मोटार मतदानाच्या काही दिवस आधी खारघर पोलिसांनी पकडली होती. ही मोटार ठाकूर यांच्या वडील व भावाच्या मालकीच्या मे. ठाकूर इन्फ्रा प्रॉजेक्ट््स या कंपनीच्या मालकीची होती. या मोटारीत ठाकूर यांचे प्रचारसाहित्य व मतदारांच्या नावाच्या स्लीपखेरीज प्रत्येकी ५०० रुपये भरलेली ५०० पाकिटे मिळाली होती. यावरून ठाकूर यांनी मतदारांना लाच दिली याबद्दल त्यांची निवडणूक रद्द करावी, अशी पाटील यांची मागणी होती.ठाकूर यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या सर्व मालमत्तांची खरी आणि संपूर्ण माहिती दिली नव्हती. आक्षेप घेऊनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने त्यांचा अर्ज वैध ठरवून स्वीकारला. या मुद्द्यावरही अरुण दत्तात्रय सावंत यांच्या याचिकेवर आमदार किसन कथोरे यांची २००४ च्या निवडणुकीत अंबरनाथ मतदारसंघातून झालेली निवडणूक जशी रद्द केली गेली होती तशीच ठाकूर यांचीही निवडणूक रद्दकरावी, असेही पाटील यांचे म्हणणे होते. न्या. गुप्ते यांनी हे मुद्देही फेटाळून लावले.या सुनावणीत याचिकाकर्ते पाटील यांच्यासाठी अ‍ॅड. सी. जी. गावणेकर व सुहास देवकर यांनी तर आमदार ठाकूर यांच्यासाठी ज्येष्ठ वकील मुकेश वशी व अ‍ॅड. सचिन शेट्ये यांनी काम पाहिले.