शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्यांमध्ये झाल्या चुका, इच्छुकांची डोकेदुखी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 06:28 IST

Navi Mumbai : प्रारूप मतदार याद्यांकडे सर्वच शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले होते. महानगरपालिकेने निवडणूक विभागाने ठरवून दिल्याप्रमाणे मंगळवारी याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.

नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याचे निदर्शनास आले आहे. मतदार वास्तव्य एका प्रभागात करीत आहेत व त्यांची नावे दुसऱ्या प्रभागात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी वाढली असून एक आठवड्यात याद्यांमधील त्रुटी शोधून सूचना व हरकती दाखल करण्यासाठीची धावपळ सुरू झाली आहे.      प्रारूप मतदार याद्यांकडे सर्वच शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले होते. महानगरपालिकेने निवडणूक विभागाने ठरवून दिल्याप्रमाणे मंगळवारी याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु प्रारूप याद्या तयार करताना फारसे परिश्रम घेतले नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्यक्ष स्थळपाहणी करून प्रभागनिहाय याद्या तयार करण्यात आलेल्या नाहीत. अंदाजे मतदारांची नावे टाकण्यात आली आहेत. यामुळे अनेक प्रभागांत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. सानपाडामधील एका प्रभागातील जवळपास एक हजार मतदार दुसऱ्या प्रभागात दाखविण्यात आले आहेत. बेलापूर, सीवूड व इतर परिसरामध्येही अशाच प्रकारे त्रुटी आढळू लागल्या आहेत. मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना धावपळ करावी लागणार आहे. मंगळवारपासूनच अनेकांनी याद्यांमधील त्रुटी शोधण्यास सुरुवात केली आहे. मुदतीमध्ये सूचना व हरकती दाखल करण्यात येणार असल्याचे अनेकांनी सांगितले. 

आरक्षणावर २३ फेब्रुवारीला सुनावणीमहानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीमध्ये पक्षपातीपणा झाल्याचा व नियमबाह्यपणे कामकाज केल्याचा आक्षेप शिवसेनेचे माजी नगरसेवक एम. के. मढवी व विनया मढवी यांनी  घेतला आहे. याविषयी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारी यावर सुनावणी होणार होती. परंतु निवडणूक विभागाचे प्रतिनिधी उपस्थित नसल्यामुळे २३ फेब्रुवारीची तारीख देण्यात आली आहे. या याचिकेवर काय निर्णय होणार, यावर अंतिम मतदार यादी व निवडणूक होणार की नाही, हे ठरणार आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका