शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सुकापूरमधील बेपत्ता मुले बुडाली; नदीत आढळला एकाचा मृतदेह; दुस-याचा तपास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 05:33 IST

पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील प्रेरणा सोसायटीतील दोन लहान मुले बेपत्ता झाल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पनवेल : पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील प्रेरणा सोसायटीतील दोन लहान मुले बेपत्ता झाल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. प्रथमेश नानाभाऊ पाटील (६) व मयांक विष्णू अडसूळ (साडेतीन वर्षे) अशी बेपत्ता मुलांची नावे असून, प्रथमेशचा मृतदेह तक्का परिसरातील गाढी नदीच्या किनारी आढळला. दुसºयाचा शोध सुरू आहे.सुकापूर येथील प्रेरणा सोसायटीत नानाभाऊ पाटील (मूळ-जळगाव) व विष्णू अडसूळ (मूळ-पैठण) कुटुंबीयांसह राहतात. रविवारी प्रथमेश व मयांक अडसूळ हे दोघे खेळण्यासाठी घराच्या बाहेर पडले. दुपारी अडीच वाजले तरी ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी शोध घेण्यास सुरु वात केली. मात्र ते कुठेही न सापडल्याने अखेर दोघेही हरविल्याची तक्र ार खांदेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केली. खांदेश्वर पोलिसांनी संध्याकाळी दोन्ही बालकांचा शोध सुरू केला. पाऊस सुरू असल्याने शोधकार्यात अडचणी येत होत्या. सोमवारी सकाळी सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीला लाल, काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या एका मुलाचा मृतदेह नदीतून वाहत जात असल्याचे निदर्शनास आले. त्याने ही माहिती पोलिसांना दिली. तो प्रथमेशचा मृतदेह होता. या प्रकरणी पोलीस उपायुक्त राजेंद्र माने, खांदेश्वरचे पोलीस निरीक्षक योगेश मोरे यांच्यासह अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करून दुसºया मुलासाठी शोधमोहीम राबविण्यात आली.खेळताना हातपाय चिखलात माखल्याने दोन्ही मुले ते धुण्यासाठी नदीवर गेली होती. या वेळी नदीत जाऊ नका, असेही एकाने त्यांना सांगितले. मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली. त्यामुळे ती बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कुचकामीएका मुलाचा मृतदेह तक्का परिसरातील नदीत आढळल्यावर दुसºया मुलाचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. या वेळी जवळपास दोन ते अडीच तास झाले तरी अग्निश्मन दलाच्या बोटीला वेग देण्यासाठी लावण्यात येणारी ओबीयन मशीन चालू झाली नाही.मशीन सुरू न झाल्याने मशीनविनाच साध्या होडीला लावून बोट पाण्यात सोडण्यात आली. विचुंबे येथील नदीच्या किनारी मशीन चालू करण्यात अडीच तास गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अशावेळी सिडकोची अग्निशमन यंत्रणा फोल ठरल्याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला.