शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मिसेस एशिया ग्रेट ब्रिटन-२०२३ च्या सौंदर्य स्पर्धेत; उरण येथील लक्ष्मी शर्माची अंतिम फेरीसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2023 16:02 IST

राजस्थानमधुन १९८५ साली रोजगारनिमित्ताने आलेला  गणेश शर्मा हा सामान्य इसम उरण-मोरा इथे स्थाईक झाला.

- मधुकर ठाकूर 

उरण : उरणमधील एका लादी कारागिराच्या मुलीचा प्रवास मिसेस एशिया ग्रेट ब्रिटन-२०२३ च्या अंतिम दिशेने होऊ लागला आहे. लंडनमध्ये २६ मे रोजी होणाऱ्या सौंदर्य स्पर्धेत लक्ष्मी शर्मा हिची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. 

राजस्थानमधुन १९८५ साली रोजगारनिमित्ताने आलेला  गणेश शर्मा हा सामान्य इसम उरण-मोरा इथे स्थाईक झाला. मिळेल ते मजुरीचे काम करणाऱ्या गणेश शर्मा यांनी लादी कारागिर म्हणून लौकिक मिळविला.लक्ष्मी शर्मा ही त्यांचीच मुलगी. तिचा जन्म आणि शिक्षण उरणमध्येच झाला.नवी मुंबईत सीएचे  शिक्षण घेतले. शिक्षणातील हुशारीच्या जोरावर लंडनमध्ये एनएचएस कंपनीत सीए म्हणून नोकरी करीत आहे.डॉक्टर योगेश कौशिक यांच्याशी  विवाहबध्द झालेल्या लक्ष्मीने संगीत -नृत्याची धडेही गिरवले आहेत.

विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमात सहभागी होत लक्ष्मीने काही सामाजिक संस्थांना आर्थिक मदतही  केली आहे. अशा या चौफेर व्यक्तीमत्व असलेल्या लक्ष्मीने लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिसेस एशिया ग्रेट ब्रिटन-२०२३ स्पर्धेत सहभागी झाली आहे. या स्पर्धेची येत्या २६ मे रोजी अंतिम फेरी होणार आहे. या अंतिम फेरीसाठी लक्ष्मीची निवड झाली आहे.तिच्या निवडीबद्दल आई-वडिल, निकटवर्तीय काका पाटील आणि विविध स्तरांवरुन शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.