शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

पालिकेकडून नागरिकांची दिशाभूल

By admin | Updated: March 28, 2016 02:35 IST

महापालिका क्षेत्रातील १०० टक्के सांडपाण्यावर सीटेक तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रात प्रक्रिया केली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु वास्तवामध्ये

- नामदेव मोरे,  नवी मुंबईमहापालिका क्षेत्रातील १०० टक्के सांडपाण्यावर सीटेक तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रात प्रक्रिया केली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु वास्तवामध्ये जुईनगर ते नेरूळ पश्चिमेकडील मलनि:सारण वाहिन्या अत्याधुनिक केंद्रांना जोडण्याचे काम रखडले आहे. जुईनगरमधील जुन्या केंद्रातून हे पाणी खाडीत सोडले जात आहे. येथील दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. केंद्र शासनाने सर्व शहरांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या सूचना संबंधित महापालिका व नगरपालिकांना दिल्या आहेत. जेएनएनयूआरएम अंतर्गत महापालिकांना यासाठी अनुदानही दिले होते. नवी मुंबई महापालिकेने या योजनेअंतर्गत शहरामध्ये सीटेक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन केंद्रे उभारली आहेत. शहरामध्ये ३६१ किलोमीटर लांबीच्या नवीन मलनि:सारण वाहिन्या टाकल्या आहेत. पालिकेला या कामगिरीसाठी केंद्र शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे. १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी पहिली महापालिका असा उल्लेख प्रशासन नेहमीच करते. पालिकेचा पर्यावरणविषयक अहवाल, संकेतस्थळ यावरही याविषयी माहिती देण्यात आली आहे. परंतु वास्तवामध्ये शहरामध्ये शंभर टक्के मलनि:सारण वाहिन्या जोडण्याचे काम पूर्ण झालेले नाही. नेरूळ पश्चिमेकडील सांडपाणी मलनि:सारण वाहिन्यांच्या द्वारे सानपाडा सेक्टर २० मधील केंद्रामध्ये सोडण्यात येणार होते. परंतु हा परिसर मँग्रोजच्या बफर झोनमध्ये येत आहे. यामुळे राज्य शासनाच्या एमसीझेडएमए प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु संबंधित विभागाने २००६ मधील जनहित याचिकेचा हवाला देवून उच्च न्यायालयाची परवानगी घेण्यास सांगितली आहे. परंतु महापालिकेने याविषयी अद्याप योग्य पाठपुरावा केलेला नाही. नेरूळ पश्चिम व जुईनगरमधील सांडपाणी सेक्टर २ मधील जुन्या मलप्रक्रिया केंद्रात सोडले जात आहे. येथे जुन्या व कालबाह्य झालेल्या यंत्रणेच्या मार्फत या सांडपाण्यावर काही प्रमाणात प्रक्रिया केली जात आहे. उर्वरित पाणी तसेच खाडीमध्ये सोडून दिले जात आहे. जुईनगरमध्ये मध्यवर्ती ठिकाणी हे केंद्र आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण होत आहे. या परिसरातील नागरिकांनी सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी सानपाडा केंद्राला जोडण्याचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे. जुना प्रकल्प बंद करून त्या जागेचा परिसरातील नागरिकांना इतर सुविधा देण्यासाठी वापर करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नगरसेवक रंगनाथ औटी यांनीही याविषयी वारंवार पाठपुरावा केला आहे. वास्तविक नेरूळसारख्या महत्त्वाच्या विभागातील मलनि:सारण वाहिन्या जोडण्याचे काम अपूर्ण असल्याची माहिती पालिकेने आतापर्यंत लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून लपवून ठेवली होती. सार्वजनिक अभियांत्रिकी विभागाने यापूर्वी अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रातील पाणी विकून पालिकेला करोडो रूपये मिळतील असे स्वप्न दाखविले होते. परंतु प्रत्यक्षात रोज १८० एमएलडी पाणी खाडीत सोडले जात आहे. याच पद्धतीने मलनि:सारण वाहिन्यांचे काम शंभर टक्के झाल्याचे सांगून पुन्हा जनतेची फसवणूक केली आहे. लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा सुरू- जुईनगरमधील नगरसेवक रंगनाथ औटी यांनी याविषयी वारंवार आवाज उठविला आहे. सेक्टर २ मधील मलनि:सारण केंद्रामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. - नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून हे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न सर्वसाधारण सभेत उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने मँग्रोजमुळे काम रखडल्याचे स्पष्ट केले आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष नेरूळ पश्चिमेकडील सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी सानपाडा सेक्टर २० मधील केंद्राला जोडण्यामध्ये मँग्रोजचा अडथळा होत आहे. एमसीझेडएमएने उच्च न्यायालयाची परवानगी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु यानंतरही जानेवारीपर्यंत महापालिकेने प्रत्यक्षात उच्च न्यायालयात धाव घेतली नव्हती. नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नावर उच्च न्यायालयात चेंबर समन्स दाखल.केंद्राचा तपशीलविभागकेंद्र (एमएलडी)सीबीडी १९नेरूळ से. ५०१००सानपाडा३७.५वाशी १००कोपरखैरणे८७.५ऐरोली८०नेरूळ से. २१७